‘झी मराठी’ वाहिनीवर अनेक नव्या मालिका सुरू होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या मालिकांचे नवनवीन प्रोमो प्रदर्शित होत असून चांगलेच चर्चेत आहेत. ‘शिवा’, ‘पारु’, ‘जगद्धात्री’, ‘पुन्हा कर्तव्य आहे’, ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिका येत्या काळात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. आता ‘शिवा’ व ‘पारु’ या नव्या मालिकांच्या प्रक्षेपणाची तारीख जाहीर झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री पूर्वा फडके व अभिनेता शाल्व किंजवडेकर यांची प्रमुख भूमिका असलेली ‘शिवा’ मालिका १२ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्यासह बरेच तगडे कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. १२ फेब्रुवारीपासून ‘शिवा’ मालिका रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहेत.

हेही वाचा- Video: “अजून काय पाहिजे राव…”, राज ठाकरेंनी ‘चला हवा येऊ द्या’मधील ‘या’ कलाकाराच्या व्यवसायाचं केलं कौतुक, पोस्ट करत म्हणाला…

तसेच अभिनेत्री शरयू सोनावणे व अभिनेता प्रसाद जवादे यांची मुख्य भूमिका असलेली ‘पारु’ मालिकाही १२ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेत मुग्धा कर्णिक, पूर्वा शिंदे, परी तेलंग, अनुज साळुंखे, प्राजक्ता वाडये, विजय पटवर्धन या कलाकारांची मांदियाळी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. ‘पारु’ मालिका १२ फेब्रुवारीपासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

हेही वाचा – Bigg Boss 17 Grand Finale: करण जोहरच्या ‘या’ चित्रपटातील गाण्यांवर ऐश्वर्या-नील, इशा-समर्थचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ आला समोर

दरम्यान, ‘शिवा’ व ‘पारु’ या दोन्ही रिमेक मालिका आहेत. ‘शिवा’ ओडिया मालिका ‘सिंदूरा बिंदी’चा रिमेक आहे. हिंदी भाषेतही यामालिकेचा रिमेक झाला आहे. ‘मीत’ असं हिंदी भाषेतल्या मालिकेचं नाव आहे. तसेच ‘पारु’ मालिका देखील तेलुगू मालिका ‘मुद्धा मंदारम’चा रिमेक आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi new serial shiva and paru start from 12 february pps
First published on: 28-01-2024 at 11:21 IST