सध्या जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येण्याचं सत्र सुरू आहे. गेल्या काही महिन्यात ‘झी मराठी’वरील काही मालिका ऑफ एअर झाल्या आहेत. ‘नवा गडी नवं राज्य’, ‘३६ गुणी जोडी’, ‘तू चाल पुढं’ या तीन मालिका आता बंद झाल्या आहेत. पण या तीन मालिकांची जागा घेण्यासाठी लवकरच नव्या मालिका सुरू होणार आहेत. ‘पारु’, ‘शिवा’, ‘जगद्धात्री’ या तीन मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. यापैकी दोन मालिकांचा प्रोमो समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी ‘पारु’ या मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता ‘शिवा’ मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काल, १४ जानेवारीला रात्री ‘झी मराठी’वरील ‘शिवा’ या नव्या मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित झाला. ‘झी मराठी’च्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर ‘शिवा’ मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये बिनधास्त जगणाऱ्या शिवाचा दमदार अंदाज पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Video: अखेर आमिर खानच्या लेकीच्या रिसेप्शन पार्टीत बॉलीवूडचे ३ खान आले एकत्र, अनेक वर्षांनी दुरावा मिटला

अभिनेत्री पूर्वा फडके ही नवा मालिकेत प्रमुख भूमिकेत म्हणजेच शिवा म्हणून पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये शिवाची दुचाकीवरून धमाकेदार एन्ट्री दाखवण्यात आली आहे. वाकड्यात शिरणाऱ्यांशी नडताना शिवा पाहायला मिळत आहे. लवकरच अन्यायाशी लढणाऱ्या या शिवाची गोष्ट सुरू होणार आहे.

हेही वाचा – आमिर खानच्या लेकीचा रिसेप्शन पार्टीतला लेहंगा तयार करायला लागले होते तब्बल ‘इतके’ महिने, डिझायनर म्हणाली…

दरम्यान, ‘शिवा’ ही मालिका ‘सिंदूरा बिंदू’ या ओडिया मालिकेचा रिमेक आहे. याआधी हिंदी भाषेत या मालिकेचा रिमेक झाला होता. ‘मीत’ असं हिंदीतल्या मालिकेचं नाव होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi new serial shiva new promo out pps
First published on: 15-01-2024 at 07:00 IST