Zee Marathi New Serial : ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळा नुकताच पार पडला. वाहिनीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यंदा भव्य सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या सोहळ्यादरम्यान ‘लक्ष्मी निवास’ या नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये हर्षदा खानविलकर, तुषार दळवी, अक्षया देवधर, मीनाक्षी राठोड यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या नव्या मालिकेची सर्वत्र चर्चा रंगलेली असतानाच वाहिनीने दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांना आणखी एका नव्या मालिकेची झलक दाखवली आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवर ‘लक्ष्मी निवास’ या कौटुंबिक मालिकेपाठोपाठ आणखी एक थ्रिलर अशी मालिका सुरू होणार आहे. एक सुंदर अशी साडी नेसलेली बाई लहान मुलीच्या बाजूला उभी असते. या मायलेकींसमोर आरसा असतो. मात्र, खरा ट्विस्ट इथेच आहे. समोरील आरशात फक्त लहान मुलीचं प्रतिबिंब दिसत असतं अन् त्या बाईची सावली कोणालाही दिसत नसते. याचीच रहस्यमय कथा प्रेक्षकांना ‘तुला जपणार आहे…’ या थ्रिलर मालिकेत पाहायला मिळणार आहे.

Zee Marathi Awards 2024 full Winners List Part 1 and Part 2
Zee Marathi Awards : यंदाची सर्वोत्कृष्ट मालिका ठरली ‘पारू’! तर, लोकप्रिय नायक-नायिका आहेत…; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Tula Shikvin Changlach Dhada
Video: चारुलता की भुवनेश्वरी? अक्षरा पडली संभ्रमात; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
zee marathi awards sharmishtha raut
‘झी मराठी’च्या दोन लोकप्रिय मालिकांची निर्माती आहे शर्मिष्ठा राऊत! पुरस्कारांचा फोटो शेअर करत म्हणाली, “सलग दुसरं वर्ष…”
Paaru
“हा बिझनेस तुमचासुद्धा…”, प्रीतम व प्रियाचा तो संवाद ऐकताच पारूने घेतला निर्णय; म्हणाली, “या घरची मोठी सून म्हणून…”
zee marathi laxmi niwas upcoming serial sukh mhanje nakki kay asta fame actress
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार! ‘त्या’ फोटोत दिसली झलक
tula shikvin changalach dhada charulata is the real bhuvneshwari
चारुलताच भुवनेश्वरी! अक्षराची शंका खरी ठरली, ‘त्या’ गोष्टीमुळे मास्तरीण बाईंनी अचूक ओळखलं; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो

हेही वाचा : Zee Marathi Awards : यंदाची सर्वोत्कृष्ट मालिका ठरली ‘पारू’! तर, लोकप्रिय नायक-नायिका आहेत…; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

‘झी मराठी’वर सुरू होणार थ्रिलर मालिका

“कधीही न दिसणारी आणि तरीही जाणवणारी ही सावली नेमकी कोणाची? ‘तुला जपणार आहे’ लवकरच!” असं कॅप्शन देत ‘झी मराठी’ वाहिनीने या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे. आता या नव्या मालिकेत मुख्य भूमिका कोण साकारणार हे अद्याप समोर आलेलं नाही. ‘झी मराठी’ने या थ्रिलर मालिकेचं नाव आणि लहानशी झलक प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे. आता ही नवीन मालिका केव्हा आणि कोणत्या वेळेला सुरू होणार याबाबत लवकरच उलगडा करण्यात येईल.

हेही वाचा : Zee Marathi – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार! ‘त्या’ फोटोत दिसली झलक

दरम्यान, टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सध्या प्रत्येक मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका सुरू होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता ‘तुला जपणार आहे’ ही मालिका सुरू होण्यापूर्वी कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका संपेल असा अंदाज वर्तवला आहे. कारण, ही सुद्धा सध्या सुरू असलेली वाहिनीवरची रहस्यमय मालिका आहे. त्यामुळे याची जागा ही नवीन मालिका घेणार असल्याचा अंदाज नेटकरी बांधत आहे. आता नव्या मालिकेची ( Zee Marathi ) तारीख अन् वेळ जाहीर झाल्यावर लवकरच याबाबत स्पष्टता येईल.

Story img Loader