‘झी मराठी’च्या ‘चल भावा सिटीत’ या नव्याकोऱ्या शोच्या माध्यमातून अभिनेता श्रेयस तळपदेने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. या कार्यक्रमाने ग्रामीण आणि शहरी पार्श्वभूमीतील स्पर्धकांना एकत्र आणलं आहे. ग्रामीण आणि शहरी भागातले स्पर्धक एकमेकांना आव्हान देतील अशी या कार्यक्रमाची संकल्पना आहे.
या शोमध्ये कोणकोणते कलाकार असतील याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर १५ मार्चला पार पडलेल्या प्रीमियरमध्ये प्रेक्षकांना सहभागी स्पर्धकांची ओळख होस्ट श्रेयस तळपदेने करून दिलेली आहे.
शहरातील सिटीसुंदरी
- अनुश्री माने – मूळची पुण्याची. अनुश्रीचा जन्म वाई येथे झाला. नृत्यांगना, मॉडेल, अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून तिची ओळख आहे. ती युट्युबवर ‘शाला’ नावाच्या वेब सीरिजमुळे प्रसिद्ध झाली.
- गुरलीन कौर – मूळची ठाण्याची. ती एक कॉन्टेन्ट क्रिएटर आहे. स्वभावाने विनोदी, बबली आणि गोंडस आहे. २०२१ मध्ये तिने ‘मिस लुधियाना’ खिताब जिंकला आहे . गुरलीन महाराष्ट्रीय नसली तरी, छान मराठी बोलते. तिला मेकअप करायला खूप आवडतं.
- अभिनेत्री गायत्री दातार – मूळची पुण्याची. इंजनिअरिंगपर्यंत तिचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. तिला ट्रेकिंग करायला आवडतं. ती गोष्टींबद्दल खूप निवडक आहे आणि तिला स्वच्छता आवडते. तिला भूक सहन होत नाही.
- श्रुती राऊळ – मूळची मुंबईची. अभिनय आणि मॉडेलिंगमध्ये करिअर करतेय. स्वभावाने धाडसी आहे. ती ‘फेमिना मिस इंडिया- गोवा’ या स्पर्धेत फायनलिस्ट राहिली आहे. एक परिपूर्ण जेन झी मुलगी आहे. शाळेत हेड गर्ल, स्पोर्ट्स हेड, स्टेज परफॉर्मर आहे. ती अत्यंत स्टायलिश आणि बोल्ड आहे.
- ऐश्वर्या अडारकर- मूळची मुंबईची. व्यवसायाने मॉडेल आणि अभिनेत्री. टॉम्बॉय व्यक्तिमत्व आपल्या माणसांसाठी लढणारी. आपल्या ध्येयांसाठी काहीही करू शकते. ती फिटनेस फ्रीक आहे.
- प्रणाली घोगरे – मूळची मुंबईची. ती बाबांची प्रचंड लाडकी आहे आणि तिला पीटी शिक्षक व्हायचं आहे.
- भाग्यश्री मुरकर – मूळची मुंबईची. व्यवसायाने मॉडेल, अभिनेत्री, आर्थिक सल्लागार.
- जोआना अलेक्झांड्रा सिओसेक – मूळ पोलंडची. पण, आता ती मुंबईत राहते. जोआनाने केरळमध्ये मरीन बियॉलॉजिच शिक्षण घेतलं आहे. तिने एरियल नृत्याचं शिक्षण देखील घेतलं आहे. ती भारतातील १५ राज्यांमध्ये फिरली आहे. जोआना सध्या मराठी भाषा शिकतेय. तिनी एका मराठी चित्रपटातही कामही केलं आहे.
- किमया रेळे – मूळची मुंबईची. व्यवसायाने मॉडेल व अभिनेत्री. ती आनंदी आणि उत्साही स्वभावाची आहे. ती आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. ती तिच्या गावी मुरुशी, रत्नागिरी येथे जागरण गोंधळ सादर करते. ती गावकऱ्यांसह याआधी राहिलेली आहे.
- रेवती अय्यर – मूळची वसईची, तिने ‘झी टीव्ही’ची ‘जागृती’ मालिकेत कालिंदीची भूमिका साकारली आहे.
- अक्षता उकिर्डे- मूळची पुण्याची. व्यवसायाने मॉडेल व रिअल इस्टेट एजेंट. तिने रिअल इस्टेटमध्ये सेल्स आणि मार्केटिंग केल आहे.
- नीता विजय निर्भवणे – मूळ – बंगळुरू/मुंबई, तिला फॅशन डिझायनर म्हणून ओळखलं जातं. ती NIFT मध्ये फॅशन डिझायनिंग शिकली आहे. ती तिच्या प्रियकरासह बंगळुरूमध्ये राहते. तिला प्रसिद्ध व्हायचं आहे.
- काजल चोणकर – मूळ मुंबईची आहे आणि ती एक अभिनेत्री आहे. ती गोव्यात बोर्डिंग स्कूलमध्ये शिकली आहे. तिने अनाथाश्रमात काम केलं आहे. याआधी तिने भाषांतराकार म्हणूनही काम केलेलं आहे.
ग्रामीण भागातील स्पर्धक
- दीपक कोळी – हुपरी, कोल्हापूर, व्यवसाय- कडक लक्ष्मी, शिक्षण -दहावी.
- हृषिकेश चव्हाण – इचलकरंजी, व्यवसाय -कुस्तीगीर, शिक्षण- पदवीचे शिक्षण घेत आहे.
- शत्रुघ्न मोगरा – पावरा , तिनसमाळ, नंदुरबार. व्यवसाय- शेतकरी आणि इतर लहान नोकऱ्या, शिक्षण- १० वी.
- मडावी पिटेझरी – नागझिरा. व्यवसाय- शेतकरी, शिक्षण १२ वी.
- रामा सोनवणे – चंदनपुरी, व्यवसाय -गोंधळी, शिक्षण बारावी.
- सुभाष चौघुले – जामखेड, व्यवसाय -बहुरूपी, गिग कलाकार, अशिक्षित
- पवन दिलीप गायकवाड- गंगापूर, संभाजीनगर, व्यवसाय- डुक्कर पकडणे आणि विकणे, शिक्षण ८ वी.
- अर्जुन माने – चिंचघरे नाशिक, व्यवसाय -बांधकाम ठिकाणी काम करणे, शिक्षण ९ वी.
- निक्सन सिद्धी – येल्लापूर जिल्हा कावर, व्यवसाय-ट्रॅक्टर चालवणे आणि गावकाम करतो, शिक्षण १० वी
- क्रिश गावडे- धनरा. शिक्षण सुरु आहे. मर्यादित संसाधने असूनही, त्याची नैसर्गिक क्रीडा कौशल्य त्याला अत्यंत स्पर्धात्मक बनवतात.
- विजय खबाळे- कोल्हापूर, व्यवसाय – शेतकरी, शेतमजूर, शिक्षण १२ वी.
- अथर्व जगताप – सातारा, व्यवसाय- बुलॉक कार्ट रेसर, शिक्षण १० वी. बैलगाडा शर्यतीसाठी बैलांना प्रशिक्षण देतो.
या स्पर्धकांना अशा आव्हानांना सामोरे जावे लागेल जिथे त्यांना आपल्यापेक्षा संपूर्णपणे वेगळं जीवन जगणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधण्यास प्रवृत्त करण्यात येईल. ग्रामीण आणि शहरी भागातले स्पर्धक एकमेकांच्या जीवनाचा अनुभव घेतील, आणि त्यांना आव्हान देतील. ‘चल भावा सिटीत’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना ग्रामीण महाराष्ट्राची समृद्धी आणि संस्कृती दर्शवेल. सिटीत गाव गाजणार म्हणजे नक्की काय होणार हे प्रेक्षकांना हळुहळू उलगडत जाईलच. दरम्यान, हा शो दररोज रात्री ९.३० वाजता प्रसारित केला जाईल.