Zee Marathi Paaru Serial : ‘झी मराठी’च्या ‘पारू’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून साधीभोळी पारू अनुष्काचं खरं रुप सर्वांसमोर आणण्यासाठी धडपड करत होती. अखेरीस तिच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. ‘पारू’ अहिल्यादेवींकडे जाऊन थेट अनुष्काची तक्रार करते. अनुष्का आदित्यची होणारी बायको आणि किर्लोस्करांची सून होणार असल्याने आता आपण पारूवर कसा विश्वास ठेवायचा या संभ्रमात अहिल्या पडते. पण, यावर मार्ग म्हणून अनुष्काच्या खोलीजवळ तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी अहिल्या सावित्रीला ( घरच्या मदतनीस ) सांगते.
अनुष्काला काही करून किर्लोस्करांच्या घरातून बाहेर पडायचं असतं. यासाठी ती सावित्रीवर हल्ला करते. सावित्रीला वॉशरुममध्ये डांबून स्वत: तिची साडी नेसून अनुष्का पळून जाते. थोड्यावेळाने अहिल्यादेवींना अनुष्कावर संशय येतो. त्या अनुष्काच्या बेडरुममध्ये येऊन तिला आवाज देऊ लागतात. त्यांना अनुष्का कुठेच सापडत नाही. इतक्यात वॉशरुमच्या दरवाजावर कोणीतरी हात मारत असल्याचं त्यांना जाणवतं. यावेळी अहिल्यादेवी वॉशरुमजवळ जाते तर, तिथे अनुष्काने सावित्रीला डांबून ठेवलं असल्याचं अहिल्यादेवीला दिसतं.
एकीकडे किर्लोस्करांकडून अनुष्का पळून जाते. तर, दुसरीकडे हरीश आणि पारूचा लहान भाऊ दिशाच्या ताब्यात असतो. दिशाला या दोघांचा जीव घ्यायचा असतो. तर पारूला काही करून आपल्या कुटुंबीयांचं रक्षण करायचं असतं.
हरिशवर थेट गोळ्या झाडून अनुष्का त्याचा खून करते. हरिशचा खून झाल्याचा पाहून पारू प्रचंड रडते, आदित्यही बिथरून जातो. या सगळ्या घडामोडींमुळे किर्लोस्करांच्या घरातून अचानक पळून गेलेल्या अनुष्काचा खोटा चेहरा अहिल्यासमोर उघड होतो. आता अहिल्यादेवी दिशा-अनुष्काला कशी अद्दल घडवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पण, अशातच आदित्य अनुष्काच्या बोलण्यात अडकून त्याला किडनॅप केलं जातं असं मालिकेत पाहायला मिळेल. आदित्य व अहिल्यादेवी दोघेजण अनुष्का-दिशाच्या ताब्यात असतात. यावेळी पारूला धमकी सुद्धा दिली जाते. ‘पारू’ सुद्धा मोठ्या हुशारीने आदित्य आणि अहिल्यादेवींची मदत करेल असं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
पारू न डगमगता दिशा आणि अनुष्काचा सामना करणार आहे. अहिल्यादेवी व आदित्यची सुटका करून अखेर पारू मालिकेत सत्याचा विजय झाल्याचा अविस्मरणीय क्षण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, या सीक्वेन्सनंतर अनुष्काच्या पात्राची मालिकेतून एक्झिट होणार आहे. याबाबत श्वेता खरातने स्वत: फोटो शेअर करत माहिती दिली आहे. ‘पारू’ मालिकेचे हे विशेष भाग १३-१४ मार्चला प्रसारित करण्यात येणार आहेत.