Paaru Zee Marathi Serial : ‘पारू’ मालिकेत सध्या दिशाची रिएन्ट्री झाल्याचा सीक्वेन्स चालू आहे. अनुष्का आणि आदित्यच्या साखरपुड्यात दिशा अचानक अवतरते आणि स्वत:च्या सख्ख्या बहिणीला धमकी देते. जेलमधून सुटल्यावर आता तिने किर्लोस्कर कुटुंबीयांविरोधात नवीन कारस्थान रचायला सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अहिल्यादेवींनी पारूला किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अँबॅसेडर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानिमित्ताने मोठ्या सेलिब्रेशनचं आयोजन करण्यात आलं आहे. ‘पारू’ आता महाराष्ट्राची मॉडेल होणार आहे. पण, याच सोहळ्याच किर्लोस्कर कुटुंबीयांना उद्धवस्त करण्यासाठी दिशा एन्ट्री घेणार आहे. तिने एका खेळण्याच्या गाडीत बॉम्ब लपवलेला असतो.

आता दिशाने ठेवलेला बॉम्ब पारु आणि आदित्य डीफ्युज करतील की, या सगळ्यात कोणाचा जीव जाईल? असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेला आहे.

आदित्यला शोधाशोध केल्यावर दिशाने लपवलेला हा बॉम्ब सापडतो. बॉम्ब पाहिल्यावर सुरुवातीला त्याच्या पायाखालची जमीन सरकते. इतक्यात पारू आदित्यवळ पोहोचते, तिला पाहताक्षणी तो म्हणतो, “पारू बॉम्ब सापडलाय…” तो बॉम्ब पाहून पारू सुद्धा खूप घाबरते. पण, आदित्य कशाचाही विचार न करता तो बॉम्ब घेऊन दूर जातो. पारू त्याला अडवण्याचा प्रयत्न करते… पण, आदित्य काहीच ऐकत नाही.

आदित्य बॉम्ब निकामी कसा करता येईल हा विचार करून दूरवर जातो. आदित्य बोटीत बसतो…आणि पाण्याच्या मध्यभागी जाऊन बॉम्ब डीफ्युज करण्याचा प्रयत्न करत असतो. दुसरीकडे, दिशा पारूजवळ येते आणि म्हणते “तू अँबॅसेडर झालीयेस याचं पोस्टर अजिबात रिव्हिल करू नकोस…तू स्टेजवर गेल्यावर पोस्टर अनावरणाचं बटण दाबू नकोस नाहीतर धमाका होईल बूम…”

दिशाचं म्हणणं ऐकून पारू आदित्यची आणखी काळजी करू लागते. इतक्यात किर्लोस्कर कुटुंबीय पोस्टर अनावरण सोहळ्याच्या सेलिब्रेशनकडे वळतात. आदित्य कसा असेल, बॉम्बचं काय झालं असे विचार पारूच्या मनात येऊ लागतात असं प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय… शेवटी हा बॉम्ब फुटतो…आता आदित्य या कठीण प्रसंगातून आपला जीव कसा वाचवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रेक्षकांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं ‘पारू’ मालिकेच्या आगामी भागात मिळतील. २१ फेब्रुवारीला हा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.