Zee Marathi Paaru Serial : ‘झी मराठी’ची ‘पारू’ मालिका सध्या रंजक वळणावर आहे. आदित्यसमोर पारू प्रेमाची कबुली केव्हा देणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आदित्य नवनवीन प्रयत्न करून पारूच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आता त्याच्या प्रयत्नांना केव्हा यश येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘पारू’ मालिकेत सध्या आदित्य आणि पारूचं प्रेम हळुहळू बहरत जात असल्याचं पाहायला मिळतंय. पण, अद्याप या दोघांनी एकमेकांसमोर प्रेमाची कबुली दिलेली नाही. या सगळ्या गोष्टींवर मालिकेची खलनायिका दामिनी खूप बारकाईने लक्ष ठेवून असते. पारूची प्रतिमा मलीन करून तिला अहिल्यादेवींसमोर वाईट ठरवायचं असा प्लॅन दामिनीचा असतो.

दामिनी पारूला सर्वांसमोर वाईट ठरवण्यासाठी एक मोठी योजना आखणार आहे. आदित्यच्या रुममधील बाथरुममध्ये जाऊन दामिनी जाणूनबुजून शॉवरचा नळ बिघडून ठेवते..जेणेकरून तो नळ बंदच होणार नाही. तसंच बाथरुममध्ये खाली साबण टाकून ठेवते, ज्यामुळे पारूचा तोल जाईल. असा सगळा प्लॅन करून दामिनी तिथून निसटते. आदित्य पारूला नादाला लावतेय असं अहिल्यासमोर भासवायचं असा प्लॅन दामिनीने केलेला असतो.

दामिनीच्या गोड बोलण्यात पारू सुद्धा फसते आणि ती बाथरुममध्ये जाऊन नळ का बंद होत नाहीये हे पाहत असते. इतक्यात आदित्य पारूला हाक मारत येतो आणि “तू इथे काय करतेस” असं तिला विचारतो. आदित्यला पाहून पारू बाहेर निघत असते, इतक्यात साबणामुळे तिचा पाय घसरतो पण, आदित्य तिला वेळीच सावरतो.

पारूला आदित्यने वेळीच सावरल्यामुळे अपघात टळतो. पण, या दोघांचं लक्ष नसताना दामिनी मोठी संधी साधते. ती बाथरुमचा दरवाजा बाहेरून लॉक करून निघून जाते. शॉवरच्या पाण्याने भिजल्यामुळे आदित्य पारूला टॉवेल देतो. पण, तो बाथरुमच्या बाहेर पडणार इतक्यात त्याला दरवाजा कोणीतरी लॉक केलाय हे लक्षात येतं.

दुसरीकडे, पारू आणि आदित्य बाथरुममध्ये कसे जाणूनबुजून अडकलेत असा गैरसमज निर्माण करण्यासाठी दामिनी अहिल्यादेवींकडे पोहोचते. आता अहिल्यादेवी यायच्या आत पारू आणि आदित्यला बाथरुमचा दरवाजा उघडता येईल का? दामिनीच्या प्लॅनमध्ये दोघंही फसणार की ऐनवेळी या परिस्थितीतून मार्ग काढणार? हे पारू मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, ‘पारू’ मालिकेचा हा विशेष भाग १५ एप्रिल सायंकाळी ७:३० वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित केला जाईल.