Zee Marathi Paaru : ‘झी मराठी’ वाहिनीवर सध्या दोन लोकप्रिय मालिकांचा विशेष महासंगम चालू आहे. ‘पारू’ आणि ‘लक्ष्मी निवास’ या मालिकांमधली शुभकार्य एकाच पॅलेसमध्ये पार पडणार आहेत. यानिमित्ताने या दोन्ही मालिकांचे कलाकार शूटिंगसाठी सुद्धा एकत्र जमल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. २७ जानेवारीपासून या विशेष भागांना सुरुवात झालेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जान्हवी आणि जयंत यांच्या शाही विवाहसोहळ्यासाठी जय्यत तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे. जयंत बिझनेसमन असल्याने या लग्नाचा सगळा खर्च तो स्वत: करणार आहे. दळवी कुटुंबीय सुद्धा लाडक्या जान्हवीच्या लग्नात धमाल करत असल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर, दुसरीकडे ‘पारू’ मालिकेत अहिल्यादेवी किर्लोस्कर यांनी आदित्यच्या साखरपुड्याचा घाट घातला आहे.

‘पारू’ मालिकेत आदित्य आणि अनुष्का यांचा साखरपुडा पार पडणार आहे. पण, या शुभकार्यात ‘पारू’ मालिकेत जुनी खलनायिका रिएन्ट्री घेणार आहे. ही खलनायिका म्हणजेच दिशा, मालिकेत हिची भूमिका अभिनेत्री पूर्वा शिंदे साकारत आहे. दिशाचं कारस्थान उघडकीस आणून दिशा आणि प्रीतमचं लग्न मोडलेलं असतं. त्यामुळे बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मालिकेत अनुष्काने एन्ट्री घेतली होती.

पण, याबद्दल अहिल्यादेवींना काहीच माहिती नसतं. त्यामुळे ते अनुष्का आणि आदित्यचं लग्न जमवतात. यादरम्यान, अनुष्का कटकारस्थानं रचून ‘पारू’ची प्रतिमा अहिल्यादेवींच्या मनातून डागळण्याचा प्रयत्न करताना दिसते. पण, आता या मालिकेत जुन्या खलनायिकेची रिएन्ट्री होणार आहे. याचा प्रोमो वाहिनीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

सध्या ‘पारू’ आणि ‘लक्ष्मी निवास’ या दोन्ही मालिकांचे कलाकार एकत्र काम करत असल्याने ‘लक्ष्मी निवास’मधली जान्हवीची मोठी वहिनी चुडा भरण्यासाठी डोक्यावर पदर घेऊन आलेल्या एका स्त्रीला पाहते ती दिशाला विचारते, “कोणाकडून आलात तुम्ही?” याशिवाय ती दिशाच्या चेहऱ्यावर झाकलेली ओढणी सुद्धा बाजूला घेते. यावर दिशा, “मी किर्लोस्करांकडून आहे” असं सांगते.

दरम्यान, आता ‘पारू’ मालिकेत अचानक दिशा आल्याने अनुष्का आणि आदित्यच्या साखरपुड्यात कोणता नवीन ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.