‘पारू'(Paaru) मालिकेत दिवसेंदिवस रंजक वळण येताना दिसत आहे. या मालिकेत आता एक नवीन पर्व सुरू झाले आहे. दिशाची बहीण अनुष्का ही किर्लोस्करांना संपवण्यासाठी, उद्ध्वस्त करण्यासाठी आली होती. पण, शेवटी अनुष्काचा यामध्ये शेवट झाला. त्यानंतर दिशाने किर्लोस्करांना पुन्हा धमकी दिली आहे. दिशाने आदित्यला किर्लोस्कर कंपनीच्या लोगोविषयी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यानुसार त्या लोगोवर एका मुलीचे डोळे आहेत आणि त्यावर दिशाचा हक्क आहे.

जर किर्लोस्करांनी आठ दिवसांच्या आत त्यांना हा लोगो कसा मिळाला याचे पुरावे सिद्ध केले नाही तर दिशा तिच्याकडील पुरावे सादर करून त्यावर हक्क सांगेल. त्यानंतर किर्लोस्करांना लोगोचा हक्क सोडावा लागेल. त्यानंतर प्रीतम व आदित्य ते डोळे कोणाचे आहेत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. ते डोळे पारूचे असतात, हे फक्त हरीशला माहीत असते, इतर कोणालाही याबद्दल कल्पना नाही. आता प्रीतम व आदित्य त्या मुलीचा शोध घेण्यासाठी स्केच आर्टिस्टला बोलावून डोळ्यांवरून त्या मुलीचा चेहरा काढण्यास सांगतात. दामिनीला ते डोळे पारूचे असल्याचे समजते. ती तो कागद फाडून टाकते. एक मुलगी प्रीतमला सांगते की ते डोळे तिचे आहेत. किर्लोस्करांना ती भेटायला येणार आहे. आता पारू मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे.

आदित्यचा संताप अनावर

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पारू मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, दामिनी सर्वांना म्हणते, आदित्यकडे स्पेशल गेस्ट आहे ना ती?मग तिला स्पेशल ट्रीटमेंट द्यायला हवी ना. त्यानंतर पाहायला मिळते की, एक मुलगी किर्लोस्करांच्या घरात येते. दामिनी व सावित्री आत्या तिचे फुले टाकून स्वागत करतात. त्यानंतर ती मुलगी किर्लोस्करांना सांगते, “ते लोगोमधील जे डोळे आहेत ना, ते माझेच आहेत.” आदित्यला ते डोळे तिचे आहेत, असे वाटत नाही. तो रागाने म्हणतो की ही काय मस्करी आहे? आदित्यचा संताप अनावर होतो. तो म्हणतो, “उद्या उठून कोणतीही मुलगी माझ्यासमोर उभी कराल आणि म्हणाल, हीच ती मुलगी, जिचे डोळे लोगोवर आहेत आणि मी त्यावर विश्वास ठेवायचा का? ही ती मुलगी नाहीये. त्यानंतर अहिल्या त्या मुलीला म्हणते, “तुला नक्कीच कोणीतरी पाठवलं आहे. आदित्य विचारतो, “कोणी करायला सांगितलं हे?”

हा प्रोमो शेअर करताना, “आदित्यच्या भावनांसोबत कोण खेळत असेल?”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, आदित्यसाठी लोगोवरील हे डोळे खूप खास आहेत. तो त्या डोळ्यांच्या प्रेमात पडला आहे. अशा सुंदर डोळे असलेल्या मुलीच्या तो गेल्या अनेक दिवसांपासून शोधात आहे. ते डोळे पारूचेच आहेत, याची त्याला किंवा इतर कोणाला माहिती नाही. तो त्याच्या मनातील गोष्टी अनेकदा फोटोतील डोळ्यांबरोबर शेअर करताना दिसतो. आता मालिकेत काय होणार, आदित्यसमोर सत्य येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader