‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ गेल्या ९ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय विनोदी कार्यक्रमांपैकी एक हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामुळे अनेक कलाकारांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. भाऊ कदमपासून ते स्नेहल शिदमपर्यंत सर्वच कलाकार या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचले आहेत. अशातच ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – चिरतरुण अभिनेते अशोक शिंदे यांचं डाएट माहितीये? जाणून घ्या

‘फूबाईफू’ हा लोकप्रिय कार्यक्रम बंद होण्यापूर्वी ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम सुरू झाला होता. २०१४ साली ‘लयभारी’ या चित्रपटाच्या निमित्ताने ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील कलाकारांची भट्टी जमली होती. तेव्हापासून हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहे. सुरुवातीला या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसाद मिळाला. पण अलीकडे हा कार्यक्रम सुमार होत चालल्याची प्रेक्षकांची तक्रार होती. यादरम्यान अनेक पर्व आणि विविध उपक्रम राबवले गेले.

हेही वाचा – “…म्हणून अक्षया देवधरेने थांबवली आहेत स्वतःची कामं”; पती हार्दिक जोशीने सांगितलं कारण

‘होऊ दे व्हायरल’, ‘सेलिब्रिटी पॅटर्न’, ‘लहान तोंडी मोठा घास’, अशा अनोख्या ढंगाने प्रेक्षकांना पुन्हा कार्यक्रमाकडे वळवण्यासाठी प्रयत्न केला गेला. पण याला काही यश आले नाही. ‘चला हवा येऊ द्या’ची लोकप्रियता अधिकच ओसरली. यामुळे टीआरपी देखील घसरला. त्यामुळे आता ‘झी मराठी’ वाहिनीने हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठवड्यात कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण होणार आहे. यासंदर्भातील वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने दिले आहे.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री गेली होती आत्महत्या करायला पण…; स्वतः प्रसंग सांगत म्हणाली…

‘महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तसंस्थेशी बोलताना अभिनेते, दिग्दर्शक निलेश साबळे म्हणाले, “‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम थांबत असला तरीही प्रेक्षकांच्या मनात तो कायमस्वरूपी राहील. गेली नऊ वर्षे एक हजारहून अधिक भागांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन कार्यक्रमाने केले आहे. माझ्यासह संपूर्ण चमूला या कार्यक्रमाने नाव, ओळख, आर्थिक स्थिरता सर्व काही दिले. तूर्तास थांबत आहोत, असे वाहिनीकडून सांगण्यात आले आहे. पुन्हा सात-आठ महिन्यांनी नवे पर्व सुरू होऊ शकते.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi popular show chala hawa yeu dya will soon off air pps