Zee Marathi New Serial : ‘झी मराठी’ वाहिनीने काहीच दिवसांपूर्वीच ‘सावळ्याची जणू सावली’ या नव्या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणली. याशिवाय या मालिकेच्या दुसऱ्या प्रोमोमध्ये यात प्रमुख भूमिकेत कोणता अभिनेता व अभिनेत्री झळकणार हे देखील स्पष्ट झालं होतं. परंतु, मालिकेच्या प्रसारणाची वेळ व तारीख वाहिनीकडून गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अखेर या नव्या मालिकेचा मुहूर्त ठरला असून नुकताच ‘सावळ्याची जणू सावली’चा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये देखील अनेक दमदार कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील मुख्य नायिकेचा ( प्राप्ती रेडकर ) आवाज फारच गोड असतो. परंतु, तिच्या गोड आवाजाचं क्रेडिट कोणीतरी वेगळंच घेऊन जातं हे नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. ‘काव्यांजली’ फेम अभिनेत्री प्राप्ती रेडकर आणि ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेता साईंकीत कामत या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे. याशिवाय लोकप्रिय अभिनेत्री सुरेखा तळवलकर तिलोत्तमा ही साईंकीतच्या आईची भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यांना लेकासाठी सुंदर व देखणी सून हवी असते. पण, सावली त्यांच्या सौंदर्याची व्याख्या बदलणार का? हे प्रत्यक्ष मालिकेत पाहायला मिळेल.

हेही वाचा : Video : जेलची शिक्षा संपताच जान्हवीने पुन्हा केला राडा! घन:श्यामची काढली अक्कल, दोघांमध्ये जोरदार भांडण, पाहा व्हिडीओ

मालिकेत लोकप्रिय कलाकारांची मांदियाळी

‘सावळ्याची जणू सावली’ ( Zee Marathi ) मालिकेत प्राप्ती रेडकर, साईंकित कामत, सुलेखा तळवलकर, वीणा जगताप, गौरी करण, आशिष कुलकर्णी, भाग्यश्री दळवी आणि मेघा धाडे हे लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. वाहिनीने नुकतीच या मालिकेच्या प्रसारणाची वेळ अन् तारीख जाहीर केली आहे.

‘सावळ्याची जणू सावली’ ही नवीन मालिका १६ सप्टेंबरपासून दररोज संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या मालिकेच्या सर्व कलाकारांवर सध्या कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

हेही वाचा : २४ वर्षे उलटली तरी आजही तशीच दिसते ‘सोनपरी’! मालिकेचे कलाकार पुन्हा एकत्र; मृणाल कुलकर्णींच्या मुलाने शेअर केले खास फोटो

‘अप्पी आमची कलेक्टर’ ऑफएअर होणार?

‘सावळ्याची जणू सावली’ या नव्या मालिकेला वाहिनीने संध्याकाळी ७ वाजता स्लॉट दिला आहे. सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवर ७ वाजता ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका प्रसारित केली जाते.

फोटो सौजन्य : Zee Marathi

आता ‘सावळ्याची जणू सावली’ या नव्या ( Zee Marathi ) मालिकेसाठी ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. आता ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेसाठी अप्पी ऑफएअर होणार की, मालिकेची वेळ बदलणार हे लवकरच स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi savlyachi janu savali marathi serial will launch on this date know the whole starcast sva 00