झी मराठी वाहिनीवर सध्या अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दोन सख्ख्या बहिणींची गोष्ट सांगणारी ‘सारं काही तिच्यासाठी’ ही मालिका आजपासून सुरु होत आहे. या मालिकेत अभिनेत्री खुशबू तावडे, शर्मिष्ठा राऊत आणि अभिनेता अशोक शिंदे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. मात्र या मालिकेसाठी झी मराठीवरील ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
झी मराठी वाहिनीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. यात ‘३६ गुणी जोडी’ ही मालिका एका रंजक वळणावर पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आता या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
आणखी वाचा : “लक्ष्मीकांत गेल्यानंतर नाईलाज म्हणून मुलांना…”, प्रिया बेर्डेंनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या “माझ्या सासरची मंडळी…”
काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेली ‘३६ गुणी जोडी’ ही मालिका संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. मात्र आता या मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांना ११ वाजता पाहता येणार आहेत. आज (२१ ऑगस्ट) ‘३६ गुणी जोडी’ ही मालिका नव्या वेळेत म्हणजे रात्री ११ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आणखी वाचा : मोठा स्विमिंगपूल, बेडरुमबाहेर निसर्गाचा नजारा अन्…; प्राजक्ता माळीच्या अलिशान फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का?
तर दुसरीकडे संध्याकाळी ७ वाजता ‘सारं काही तिच्यासाठी’ ही नवी मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन सख्ख्या बहिणींच्या नात्यावर आधारलेली ही मालिका आहे. २० वर्षांपूर्वी त्यांची ताटातूट कशी होते आणि पुढे त्यांचं नातं कसं सांधलं जातं हे या मालिकेत दाखवण्यात येणार आहे.