झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या मालिकेमध्ये जेष्ठ विशेष सरकारी वकील उज्वल निकम आणि आयएएस ऑफिसर विश्वास पाटील दिसणार आहेत. मालिकेतील अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी युपीएससीची परीक्षा पास झाली आहे. आता तिचं कलेक्टर बनण्याचं स्वप्न साकार होणार आहे. त्याचपूर्वी तिला आणखी एका परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे.

कार्यक्रमात कलेक्टर या पदासाठी अप्पीची मुलाखत उज्वल निकम व इतर मंडळी घेणार आहेत. या मुलाखतीदरम्यानचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अप्पीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात येतो. यावेळी अप्पीने दिलेलं उत्तर विशेष लक्ष वेधून घेणारं आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
pune video : 80 years old lady selling panipuri
पुण्यातील ८० वर्षांची आज्जी विकते पाणी पुरी, Viral Video एकदा पाहाच
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे

आणखी वाचा – “अपघातात त्यांचं निधन झालं आणि…” नाना पाटेकरांनी सांगितला ‘सिंहासन’ दरम्यानचा ‘तो’ वाईट प्रसंग, म्हणाले, “चित्रपटात मी त्यांना मारलं म्हणून…”

“छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती होती?” असा प्रश्न अप्पीला मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. या प्रश्नाला तिने दिलेलं उत्तर ऐकून नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. अप्पी या प्रश्नाला उत्तर देत म्हणाली, “मॅडम वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळे संदर्भ आहेत. अनेक इतिहासकारांनी वेगवेगळे अंदाज लावले आहेत. अंदाजे त्यांची उंची पाच फुट पाच इंचं ते पाच फुट आठ इंचं एवढी असेल”.

आणखी वाचा – “शेतीच करत राहिलो असतो तर…” ‘सैराट’नंतर तानाजी गालगुंडेने केली पायाची सर्जरी, म्हणाला, “माझे दोन्ही पाय…”

अप्पीच्या या उत्तरावर मुलाखत घेणारी महिला म्हणते, “मला ठाम उत्तर हवं आहे”. यावर अप्पी म्हणते, “मॅडम ४४०६ फूट उंच असलेला तोरणा किल्ला महाराजांनी काबीज केला. साडे तीनशे वर्षांची गुलामी तोडून स्वराज्याचं तोरण बांधलं. आता या माणसाची उंची आपण कशी मोजायची नाही का…”

आणखी वाचा – “ड्रग्ज घेतो आणि…” शेखर सुमनच्या मुलाचा बॉलिवूडबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाला, “वडिलांवरील राग काढण्यासाठी मला…”

झी मराठी वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. अप्पीच्या उत्तराने मन जिंकलं, जय शिवराय, एक नंबर, या मालिकेच्या लेखकाचं विशेष कौतुक, लेखकाला सलाम अशा विविध कमेंट नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर केल्या आहेत.

Story img Loader