काही महिन्यांपूर्वी ‘झी मराठी’वरील ‘लोकमान्य’, ‘लवंगी मिरची’ या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर आता आणखी एक मालिका ऑफ एअर झाली आहे. रोशन विचारे, सानिया चौधरी, शरद पोंक्षे, किशोरी अबिये अभिनीत ‘दार उघड बये’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ७ ऑक्टोबरला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. याच निमित्ताने मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री सानिया चौधरीने भावुक पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा – Video: ११ महिन्यांनंतर आलिया भट्ट-रणबीर कपूरच्या लेकीची पहिली झलक, पाहा राहाचा व्हिडीओ

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
tharla tar mag arjun confess love for sayali at bus stand
ठरलं तर मग : अखेर तो क्षण आला! एसटी स्टँडवर जाहीर घोषणा करत अर्जुनने दिली प्रेमाची कबुली; म्हणाला, “मिसेस सायली…”
monali thakur leave the live concert
Video : प्रसिद्ध गायिकेने ‘या’ कारणामुळे अर्ध्यावर सोडला वाराणसीमधील कॉन्सर्ट, चाहत्यांची माफी मागत म्हणाली; “बेजबाबदार लोकांवर…”
Bollywood actor varun Dhawan reveals wife of a powerful man broke into his house without permission
वरुण धवनच्या घरात घुसली होती चाहती, प्रसंग सांगत अभिनेता म्हणाला, “एका पॉवरफुल व्यक्तीची ती पत्नी होती अन्…”
Navri Mile Hitlarla
Video: “मेरी दिल की…”, एजे-लीलाचा रोमँटिक अंदाज; प्रोमो पाहताच नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया, म्हणाले, “आमच्या भावनांशी…”
singer kartiki gaikwad share special post for sukh mhanje nakki kay asta serial
लवकरच बंद होणाऱ्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं कार्तिकी गायकवाडशी आहे खास कनेक्शन, गायिका पोस्ट करत म्हणाली….

१९ सप्टेंबरला २०२२ला ‘दार उघड बये’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. मुक्ता आणि सारंगची जोडी प्रेक्षकांना आवडू लागली. मालिकेने ३०० हून अधिक भागांचा टप्पा ओलांडला असून आता मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. अभिनेत्री सानिया चौधरीने मालिकेच्या सेटवरील काही फोटो शेअर करत या प्रवासाचा अनुभव चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.

हेही वाचा – Video: इस्रायलमध्ये अडकलेली नुसरत भरुचा सुखरुप परतली मायदेशी; व्हिडीओ आला समोर

सानियाने लिहीलं आहे की, ‘मुक्ता’चा वर्षभराचा अविस्मरणीय प्रवास आज संपला. उद्यापासून मुक्ता तुमच्या भेटीला नसेल… या कथेला जरी पूर्णविराम मिळत असला, तरी ‘मुक्ता ‘ माझ्यामध्ये कायमची सामावली गेली आहे. खंबीर, बेधडक, अन्याय सहन न करणारी, पण तितकीच प्रेमळ ,गोड आणि हळवी…आपली कला आणि नाती सुद्धा जीवापाड जपणारी मुक्ता…जिने कलेवर जिवापाड प्रेम करणं नव्याने शिकवलं….मुक्ताचे खूप खूप आभार…मला मुक्ता साकारायला मिळाली म्हणून… आणि प्रेक्षकहो तुमचे सुद्धा आभार, कारण तुमच्या प्रेमाने मला शेवटच्या भागापर्यंत त्याच उत्साहाने मुक्ता साकारण्याची ताकद दिली.

पुढे अभिनेत्रीने लिहीलं आहे की, संपूर्ण मालिकेत माझे सगळ्यात जास्त सीन शूट झाले ते संबळ आणि देवी आईबरोबर… मालिकेची सुरुवात मी संबळ वाजवत झाली आणि शेवट ही संबळ वाजवतच झाला…यांना अंतर कसं देणार? म्हणून सेटवरुन माझ्या जिवाभावाच्या या दोन्ही गोष्टी, संबळ आणि देवी आईचा मुखवटा हक्काने माझ्याबरोबर घरी घेऊन आले…. आता त्या कायम माझ्याजवळ असतील आणि ‘मुक्ता’ कायम माझ्या मनात असेल …

हेही वाचा – “माझी मुलगी सुरक्षित, ती भारतात…”; इस्रायलमध्ये अडकलेल्या नुसरत भरुचाच्या आईची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

हेही वाचा – Video: ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम साक्षी गांधी लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस, पाहा प्रोमो

दरम्यान, या मालिकेतील रोशन विचारे आता नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘सोनी मराठी’वरील नवी मालिका ‘खरंच तिचं काय चुकलं?’ यामध्ये रोशन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तसेच या मालिकेत अभिनेत्री भाग्यश्री दळवी देखील पाहायला मिळणार आहे.

Story img Loader