मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते शरद पोंक्षे ‘दार उघड बये’ मालिकेमुळे चर्चेत आहेत. या मालिकेत ते रावसाहेब ही खलनायकाची भूमिका साकारत आहेत. झी मराठी वाहिनीवरील या नव्या मालिकेला प्रेक्षकांचाही प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेच्या कथानकाची गरज म्हणून शरद पोंक्षेंनी स्त्री पात्र साकारलं होतं. आता स्त्री वेशातील भूमिकेबाबत त्यांनी भाष्य केलं आहे.
आणखी वाचा – करीना कपूर खानने राजस्थानमधील रिसॉर्टमध्ये साजरा केला सासूबाईंचा वाढदिवस, एका दिवसाचं भाडं ऐकून व्हाल थक्क
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पोंक्षे यांनी स्त्रीची भूमिका करणं ही मालिकेच्या कथानकाची गरज होती. तसेच स्त्री वेशामध्ये तयार होण्यासाठी किती वेळ लागला? याबाबत सांगितलं. ते म्हणाले, “‘सजन रे झुठ मत बोलो’ मालिकेमध्ये स्त्री वेशांतर मी केलं होतं. २०१७ व २०१८ची ही गोष्ट आहे. त्याच्यानंतर आता स्त्री वेश परिधान करण्याची मला संधी मिळाली.”
“संधी म्हणण्यापेक्षा कामाचा एक भाग आहे म्हणून मला ते करावं लागलं. कारण पुरुषांनी स्त्रीचं वेश परिधान करणं हे जर कथानकाची गरज असेल तर ते करावं. अन्यथा ते फार हिडीस व विभत्स दिसतं असं मला वाटतं.”
आणखी वाचा – लग्नानंतर नाशिकला पोहोचले राणादा-पाठकबाई, अक्षया देवधरच्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधलं लक्ष
पुढे ते म्हणाले, “स्त्रीच्या लूकसाठी मी फक्त दहा मिनिटांमध्ये तयार झालो. यामागचं कारण म्हणजे त्या पात्रासाठी फार मेकअप करायचा नव्हता. मला साडी नेसवण्यात आली. खरंच मला या पात्रासाठी दहा मिनिटांचा वेळ लागला. त्यानंतर पुढच्या १५ मिनिटांमध्ये आम्ही चित्रीकरणाला सुरुवात केली.” शरद पोंक्षे यांना स्त्रीच्या वेशामध्ये पाहून प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले होते.