‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही झी मराठी वाहिनीवरील मालिका सध्या बरीच चर्चेत आहे. प्रार्थना बेहरे व श्रेयस तळपदेची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळताना दिसते. त्याचबरोबरीने मालिकेमधील इतर कलाकारही चर्चेत असतात. त्यातीलच एक कलाकार म्हणून अभिनेत्री काजल काटे. या मालिकेमध्ये ती शेफाली हे पात्र साकरत आहे. नेहा म्हणजेच प्रार्थनाची सहकारी व खास मैत्रीणीची ती भूमिका साकारते. सध्या काजल तिच्या कामाबरोबर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

आणखी वाचा – प्राजक्ता माळीला फक्त पाहण्यासाठी पुण्याहून मुंबईला आलेली ‘ती’ खास व्यक्ती कोण? अभिनेत्रीनेच पोस्ट शेअर करत केला खुलासा

23 year old woman drowned her one year old son in water tank in Washind area of ​​Bhiwandi
जन्मदात्या आईकडूनच मुलाची हत्या
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी

झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमामध्ये प्रार्थनाबरोबर काजलनेही हजेरी लावली होती. अभिनेता सुबोध भावे या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करत आहे. यावेळी काजलला त्याने काही प्रश्न विचारले. तुझ्या करिअरचा सुरुवातीचा काळ कसा होता? असं सुबोधने यावेळी काजलला विचारलं. यावेळी तिने आपल्या आई-वडिलांचा उल्लेख करत दुःखद प्रसंग सांगितला.

काजल म्हणाली, “गेल्या ४ वर्षांमध्ये माझ्या आयुष्यामध्ये बरेच चढ-उतार आले. कोविडमध्ये माझ्या आई-वडिलांचं निधन झालं. त्यावेळी मी चेन्नईमध्ये होते. आपल्याला करोना झाला आहे ते आई-बाबांना कळालंच नाही. त्यांना वाटलं आपल्याला साधा सर्दी-खोकला झाला आहे. त्यानंतर त्यांनी करोना लस घेतली. लस घेतल्यानंतर त्यांना अधिक त्रास जाणवू लागला.”

आणखी वाचा – Video : प्रार्थना बेहरे व श्रेयस तळपदेचा रोमान्स, ‘तो’ व्हिडीओ पाहून अभिनेत्रीच्या नवऱ्याने केलेली कमेंट चर्चेत

“आधी आई गेली. ज्यादिवश मी रुग्णालयामध्ये फक्त पोहोचले आणि मला कळलं की आईचं निधन झालं आहे. बरोबर तिच्या १४ दिवसांनी बाबांचं निधन झालं. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशीच बाबांचं निधन झालं. आम्हाला सतत बाबा विचारायचे की आई कशी आहे? ते १४ दिवस आम्ही त्यांना ती ठिक आहे असं खोट सांगितलं. त्यांना काहीच सांगू नका असं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं. आई-बाबांचं निधन झाल्यानंतर महिन्याभरातच मला ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेसाठी फोन आला.” काजलचं हे बोलणं ऐकून मंचावर उपस्थित मंडळीही भावुक झाली. तसेच प्रार्थनालाही अश्रू अनावर झाले.

Story img Loader