अगदी कमी कालावधीतच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेने प्रेक्षकांना आपलंस केलं. या मालिकेमधील प्रार्थना बेहरे व श्रेयस तळपदे म्हणजे नेहा-यशच्या जोडीवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. मालिकेमध्ये सगळं काही सुरळीत सुरु असताना एक नवा ट्विस्ट आला आहे. यश व नेहाच्या गाडीला अपघात झाला असल्याचं दाखवण्यात आलं. दरम्यान परीलाही आपली आई अचानक निघून गेल्याने दुःख होत आहे. दरम्यान प्रार्थनाने शेअर केलेला व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
आणखी वाचा – Video : प्रार्थना बेहरेचं घर तुम्ही पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसली झलक
नेहाच्या अपघातानंतर ‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये प्रार्थना दिसलीच नाही. नेहाला परत आणा अशी प्रेक्षक मागणी करत होते. दरम्यान प्रार्थनाने मालिकेमधील तिचा नवा लूक सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला. यावेळी तू लवकर मालिकेमध्ये पुनरागमन कर असं प्रेक्षक सतत म्हणत होते.
पाहा व्हिडीओ
आताही प्रार्थनाने याच मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचा नवा लूक पाहायला मिळत आहे. प्रार्थनाने व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “नेही की अनुष्का.” तिच्या या पोस्टनंतर प्रेक्षकांनी विविध कमेंट करण्यास सुरुवात केली आहे.
मालिकेमध्ये अचानक आलेला ट्विस्ट पाहता प्रेक्षक नाराज झाले होते. शिवाय नेहा मालिकेमधून गायब झाल्याने आता पुढे काय घडणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. पण नेहा आता नव्या रुपामध्ये मालिकेमध्ये पुन्हा एंट्री करणार आहे. पण आम्हाला अनुष्का नव्हे तर नेहाच पाहिजे अशी मागणी प्रेक्षक करत आहे.