झी मराठी वाहिनीवरील ‘तू तेव्हा तशी’ मालिका सध्या प्रचंड चर्चेत आहे. अभिनेता स्वप्निल जोशी व अभिनेत्री शिल्पा तुळसकर या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहे. सध्या ही मालिका रंजक वळणावर आहे. सौरभ (स्वप्निल जोशी) व अनामिका (शिल्पा तुळसकर) यांच्या नात्यामध्ये मध्यंतरी फुट पडली होती. अनामिकाच्या नवऱ्याची (अशोक समर्थ) एंट्री झाल्यानंतर मालिकेच्या कथानकाने वेगळं वळण घेतलं. आता पुन्हा एकदा सौरभ-अनामिका एकत्र आले आहेत. पण सध्या ही मालिका भलत्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याचं झालं असं की ‘तू तेव्हा तशी’च्या नव्या भागामध्ये अनामिका नवऱ्यापासून घटस्फोट मिळावा म्हणून कोर्टासमोर आपली बाजू मांडत असते. होय मी सौरभबरोबर लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं सत्य ती कोर्टासमोर कबुल करते. तसेच एकंदरीतच लिव्हइन रिलेशनशिपबाबत अनामिका बोलत असते.

पाहा व्हिडीओ

याचा एक व्हिडीओ झी मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एक चूक प्रेक्षकांनी पकडली आहे. हा सीन करत असताना अनामिकाने वेगवेगळे कानातले घातले आहेत. एका कानात वेगळे कानातले दिसत आहेत. तर दुसऱ्या कानात वेगळेच कानातले असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे.

आणखी वाचा – Video : प्रार्थना बेहरे व श्रेयस तळपदेचा रोमान्स, ‘तो’ व्हिडीओ पाहून अभिनेत्रीच्या नवऱ्याने केलेली कमेंट चर्चेत

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी विविध कमेंटही केल्या आहेत. तुझे कानातले वेगवेगळे आहेत, तू दोन वेगवेगळे कानातले घातले आहेस असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.