झी मराठी वाहिनीवरील ‘तू तेव्हा तशी’ मालिका सध्या प्रचंड चर्चेत आहे. अभिनेता स्वप्निल जोशी व अभिनेत्री शिल्पा तुळसकर या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहेत. सध्या ही मालिका रंजक वळणावर आहे. सौरभ (स्वप्निल जोशी) व अनामिका (शिल्पा तुळसकर) यांच्या नात्यामध्ये आता नवा ट्विस्ट आला आहे. सौरभ-अनामिकामध्ये प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. दोघंही लग्न न करताच एकत्र राहणार आहेत.

आणखी वाचा – “आमच्या दोघांमध्ये फक्त श्वासाचं अंतर होतं अन्…” स्वप्निल जोशीसह इंटिमेट सीन करण्याबाबत शिल्पा तुळसकरचं वक्तव्य

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
an old lady amazing dance in grand daughters wedding
आज्जी असायला नशीब लागतं! नातीच्या लग्नात आज्जीने केला भन्नाट डान्स, VIDEO एकदा पाहाच
Brother sister emotional video bride remembered his father at the wedding and crying emotional video goes viral
VIDEO:”जेव्हा वडिलांची जागा भाऊ घेतो” अंगाला हळद लागली पण बघायला बाप नाही, वडिलांचा फोटो घेऊन भावानं काय केलं पाहा
a husband expressing love for his wife in front of family
असा नवरा भेटायला नशीब लागतं! कुटुंबासमोर व्यक्त केलं बायकोवरचं प्रेम, पाहा Viral Video
shocking video : parents should take care of their children.
VIDEO : पालकांनो, तुमची मुले करू शकतात अशा चुका! चिमुकला अडकला लिफ्टमध्ये; पाहा, पुढे काय घडले?

मध्यंतरी सौरभ-अनामिकामध्ये मतभेद झाले असल्याचं पाहायला मिळालं. त्यामध्येच अनामिकाच्या नवऱ्याची (अशोक समर्थ) एंट्री झाल्यानंतर मालिकेच्या कथानकाने वेगळं वळण घेतलं होतं. आता सौरभ-अनामिकाने लिव्हइनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. सौरभच्या माई मावशीने दोघांनाही लिव्हइनमध्ये राहायचं असेल तर घर सोडण्याचा सल्ला दिला.

माई मावशीच्या सल्ल्यानंतर सौरभ-अनामिकाने त्यांच्या नवीन घरामध्ये प्रवेश केला आहे. पण यांची नवीन घरातील एंट्री आणि त्यादरम्यानच्या सीनने मात्र प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लग्न न करताच अनामिकाने पायात जोडवी घातली असल्याचं मालिकेमध्ये दाखवण्यात आलं आहे, शिवाय नव्या नवरीप्रमाणे तिने सौरभसह नव्या घरात गृहप्रवेश केला आहे.

आणखी वाचा – “माझा बॉयफ्रेंड होता तरीही…” अभिनेत्री शिल्पा तुळसकरचा अफेअरबाबत खुलासा

लग्नानंतरच्या रिती-परंपरा लिव्हइनमध्येच राहून दोघंही पूर्ण करत आहेत. लग्नानंतर स्त्री परिधान करत असलेला कोणताच दागिना अनामिकाने घातला नाही. फक्त जोडवी घालून ती गृहप्रवेश करताना दिसत आहे. लग्नाचा कोणताही सीन न दाखवता अनामिकाने फक्त जोडवी घातल्याचं पाहून प्रेक्षकही गोंधळले आहेत.

Story img Loader