Shiva fame Purva Kaushik Dance Video : मालिका या मनोरंजनातील महत्वाचा भाग आहेत. विविध वाहिन्यांवर विविध कथा असलेल्या मालिका प्रेक्षकांच्या दररोज भेटीला येतात. या मालिकेत येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवत असतात. अनेकदा या मालिकांचे महासंगम असतात. त्यावेळी दोन किंवा त्याहून अधिक मालिकांतील कलाकार एकत्र काम करताना दिसतात. आता झी मराठी वाहिनीवरील कलाकार होळीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. त्यांच्या डान्सचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.

‘मराठी मनोरंजन विश्व’ या सोशल मिडिया अकाउंटने सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या शिवा या मालिकेतील कलाकार डान्स करताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या ‘रंग बरसे’ या गाण्यावर शिवासह इतर कलाकारांनी ठेका धरल्याचे दिसत आहे. यामध्ये सावळ्याची जणू सावलीमधील सावली-सारंग, नवरी मिळे हिटलरला मालिकेतील सरस्वती-लक्ष्मी, लाखात एक आमचा दादा मालिकेतील राजश्री, धनश्री, तेजश्री असे सर्व कलाकार या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मराठी मनोरंजन विश्वने शिवाची भूमिका साकारणाऱ्या पूर्वा कौशिकला टॅग केले आहे. पूर्वा कौशिकचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. काही व्हिडीओंमध्ये पूर्वा शिंदे, अक्षया देवधर यासह अनेक कलाकार या व्हिडीओत पाहायला मिळत आहेत.

काही दिवसांपूर्वीच झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला होता. ज्यामध्ये सर्व नायिका एकत्र येऊन खलनायिकांविरोधात उभ्या राहणार असल्याचे म्हटले होते. ‘पारू’ मालिकेतील पारू, ‘शिवा’ मालिकेतील शिवा, ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील तुळजा, ‘लक्ष्मी निवास मालिकेतील भावना व जान्हवी, नवरी मिळे हिटलरला मधील लीला अशा सर्व अभिनेत्रींनी एकत्र येत खलनायिकांच्या योजना उद्ध्वस्त करण्याचा प्रण घेतला होता. या मालिकांचा महासंगम असल्याचे या प्रोमोमध्ये म्हटले होते. त्यामुळे या महासंगममध्ये काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते.

दरम्यान, आता कलाकारांच्या डान्सचे व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहे. आता महासंगममध्ये नेमके काय होणार, कोणत्या खलनायिकांना नायिका धडा शिकवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओखाली लोक भरभरून कमेंट्स करत आहेत.

Story img Loader