‘खुपते तिथे गुप्ते’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत गाजलेला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाची दोन पर्वे यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर अनेक वर्षांनी आता हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाचे तिसरे पर्व ४ जूनपासून सुरू होत आहे. या कार्यक्रमाचे वेगवेगळे प्रोमो सध्या व्हायरल होत आहेत. अशातच राज ठाकरे यांच्या या कार्यक्रमातील एका प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ‘खुपते तिथे गुप्ते – ३’च्या पहिल्या भागात पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची या कार्यक्रमातील पहिली झलक समोर आली. तर त्या पाठोपाठ त्यांचा प्रोमो आता समोर आला आहे. या प्रोमोमध्ये ते जुने फोटो पाहून भावुक झालेले दिसत आहेत.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मी होतो तरीही…”
shashank ketkar slam on bmc of the issue of cleanliness watch video
Video: “जर BMC आणि कचरा टाकणारी जनता निर्लज्ज…”, अस्वच्छेवरून शशांक केतकर पुन्हा संतापला; म्हणाला, “आता खपवून घेणार नाही…”
a woman forgot her husband while talking on a call
मोबाईलच्या नादात चक्क नवऱ्याला विसरली, पेट्रोल पंपावर आली नवऱ्याबरोबर पण.. VIDEO होतोय व्हायरल
a young guy said funny ukhana by mentioning the name of dhoni
“धोनीने मारला सिक्स…” तरुणाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच

आणखी वाचा : Video: अशोक सराफ यांना ‘मामा’ म्हणण्याची सुरुवात कुठून झाली? स्वतः खुलासा करत म्हणाले होते…

‘झी मराठी’च्या सोशल मीडिया अकाउंटवरून या एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये अवधूत गुप्ते राज ठाकरेंना काही जुने फोटो दाखवताना दिसत आहे. या फोटोंमध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आहेत. त्यांच्यातला जिव्हाळा या फोटोंमध्ये दिसून येत आहे. हे फोटो दाखवल्यावर अवधूत गुप्तेने त्यांना विचारले की, “काय वाटतं हे सगळं एकत्र पाहून?” यावर राज ठाकरे म्हणाले, “खूप छान दिवस होते ते. माहीत नाही मला.. कोणीतरी विष कालवलं किंवा नजर लागली.” यावर अवधूत म्हणाला, “आता परत येऊ नाही शकणार…” हा प्रोमो आता चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा : Video : ‘खुपते तिथे गुप्ते’च्या पहिल्या भागात हजेरी लावणार राज ठाकरे, प्रोमोवर केमेंट करत तेजस्विनी पंडित म्हणाली…

दरम्यान, या कार्यक्रमाचे हे नवे पर्व ४ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षकांच्या मनातली उत्सुकता आणखी वाढलेली दिसत आहे.

Story img Loader