झी मराठी वाहिनीवरील मालिका कायमच चर्चेत असतात. प्रेक्षकांचादेखील या मालिकांना उत्तम प्रतिसाद मिळत असतो. झी वाहिनी आता एक नवी मालिका सुरु होणार आहे. सासू सुनेच्या नात्यावर भाष्य करणारी नवी मालिका अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एका खोडकर सुनेच्या आणि तिच्या खोडीवर कुरघोडी करणाऱ्या खट्याळ मिश्किल सासूची गोष्ट यात दाखवली जाणार आहे.
नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.आधुनिक काळात, सासू सूने मधील नातं, एकमेकींशी कधी भांडत तर कधी एकमेकींना चिमटे काढत कसं बहरत जातं, याचा धमाल प्रवास यात बघायला मिळेल या मालिकेत पहिल्यांदाच जेष्ठ अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी सासूच्या भूमिकेत तर खोडकर सून साकारतेय स्वानंदी टिकेकर. निर्मात्यांनी अद्याप मालिकेच्या संपूर्ण स्टार कास्टची नावे उघड केलेली नाहीत परंतु सूत्रांनुसार, लवकरच दोन प्रसिद्ध कलाकार देखील या मालिकेचा भाग असतील. निर्माते त्यांचा एक नवीन प्रोमोदेखील प्रदर्शित करतील.
घराघरात घडणाऱ्या सासू सूनांच्या भांडणाना विनोदाच्या आरशात बघण्याची संधी ही गोष्ट प्रेक्षकांना मिळवून देईल याची नक्की खात्री वाटते. ‘अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई?” २१ डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री १० वाजता झी मराठीवर पाहता येईल