अभिनेता सिद्धार्थ जाधव आज मराठीमधील टॉपचा अभिनेता आहे. इतकंच नव्हे तर बॉलिवूडमध्येही त्याने काम करण्यास सुरुवात केली. पण यशाच्या शिखरावर पोहोचलेला हा अभिनेता म्हणजे अगदी सामान्य कुटुंबातील मुलगा. कलाक्षेत्रामध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची होती. याबाबतच सिद्धार्थने आता स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आता होऊ दे धिंगाणा’ कार्यक्रमामध्ये खुलासा केला आहे. यावेळी त्याला अश्रूही अनावर झाले.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून ब्रेक घेत समीर चौगुले ऑस्ट्रेलियाला रवाना, कारण…

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Sing Death : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, “माझे आदर्श आणि मार्गदर्शक..”
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?

‘आता होऊ दे धिंगाणा’ कार्यक्रमाचं सिद्धार्थ सुत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमाध्ये सिद्धार्थला खास सरप्राईज देण्यात आलं. हे खास सरप्राईज पाहून मंचावरच सिद्धार्थ ढसाढसा रडू लागला. कार्यक्रमामध्ये त्याच्या कुटुंबातील मंडळींनी हजेरी लावली होती. त्यांना पाहून सिद्धार्थ भावुक झाला.

पाहा व्हिडीओ

सिद्धार्थचे आई-वडील व त्याच्या भावाने कार्यक्रमाध्ये हजेरी लावत त्याला सरप्राईज दिलं. आपल्या जवळच्या व्यक्तींना मंचावर पाहून सिद्धार्थलाही सुखद धक्का बसला. आपल्या आई-वडील व भावाला मिठी मारून तो रडू लागला. त्यानंतर आपल्या खासगी आयुष्याबाबत तसेच घरातीच आर्थिक परिस्थितीबाबत त्याने भाष्य केलं.

आणखी वाचा – Video : कराडजवळील गावी गेला अन् शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, व्हिडीओ व्हायरल

तो म्हणाला, “दादरच्या प्लाझा चित्रपटगृहाबाहेर माझे बाबा खाली पेपर टाकून त्यावर झोपायचे. त्यांना अभिमान आहे की आपल्या पोराने आज त्याच्यासमोरच असलेल्या टॉवरमध्ये घर घेतलं आहे.” आपल्या खासगी आयुष्याबाबत सांगत असताना सिद्धार्थसह मंचावर असणारी इतरही मंडळी रडू लागली.

Story img Loader