झी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी व्हायच्या. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता सुबोध भावे करत होता. कार्यक्रमातील इतर महिला आणि सुबोध भावे मिळून सहभागी महिलेला बोलतं करायचे.
‘बस बाई बस’ हा कार्यक्रम खास महिलांसाठी सुरू करण्यात आला होता. महिलांसाठी विशेष असलेल्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. २९ जुलैला सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे २६ भाग प्रसारित झाले. आठवड्यातील दर शुक्रवारी-शनिवारी रात्री ९:३० वाजता झी वाहिनीवर या कार्यक्रमाचे प्रक्षेपण केले जायचे. २२ ऑक्टोबरला या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित झाला.
हेही वाचा >> …अन् रणवीर सिंगने बायकोकडे मागितलं किस, दीपिका पदुकोणच्या पोस्टवरील कमेंट चर्चेत
हेही पाहा >> Photos : ६० तोळे सोने, म्हाडाचं घर अन्…, दीपाली सय्यद यांची एकूण संपत्ती माहितीये का? डोक्यावर आहे ३२ लाखांचं कर्जही
‘बस बाई बस’ शोच्या शेवटच्या भागात अभिनेत्री सायली संजीवने हजेरी लावली होती. हर हर महादेवची टीम चित्रपटाच्या प्रमोशनकरिता या शोमध्ये सहभागी झाली होती. या शोच्या पहिल्या भागात खासदार सुप्रिया सुळेंची मुलाखत घेण्यात आली होती. याबरोबरच बस बाई बसमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनीही हजेरी लावली होती.
हेही वाचा >> “अपूर्वा हा शो नक्कीच जिंकू शकते”, ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर पडलेल्या सदस्याचं वक्तव्य चर्चेत
राजकीय व्यक्तिमत्त्वांबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींनाही बस बाई बस शोमध्ये सुबोध आणि इतर महिलांनी बोलतं केलं. मुलाखत खुमासदार करण्यासाठी कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलेबरोबर अनेक गमतीशीर खेळही खेळले जायचे. आता ‘बस बाई बस’च्या वेळेत ‘फू बाई फू’ हा कार्यक्रम ३ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे.