Zee Marathi : ‘झी मराठी’ वाहिनीवर लवकरच ‘लक्ष्मी निवास’ ही नवीन मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांना दमदार स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी यांच्या मध्यवर्ती भूमिका असणार आहेत. एकत्र कुटुंब, स्वप्नातलं घर बांधावं, मुलींची लग्न थाटामाटात व्हावी ही इच्छा आणि या सगळ्यासाठी दिवसरात्र मेहनत करणारे आई-बाबा असं एकंदर मालिकेचं कथानक असणार आहे. यंदा ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्याला या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे ‘लक्ष्मी निवास’ मालिका केव्हा ऑन एअर होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.

‘लक्ष्मी निवास’ ही बहुप्रतीक्षित मालिका येत्या २३ डिसेंबरपासून रात्री ८ वाजता प्रसारित केली जाणार आहे. सध्या या स्लॉटला अक्षरा-अधिपतीची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सुरू आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर २३ डिसेंबरपासून वाहिनीवर काही मोठे बदल करण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास तीन मालिकांच्या वेळा बदलण्यात येतील. वाहिनीवरची ( Zee Marathi ) एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल, तर ‘लक्ष्मी निवास’ ही नवीन मालिका सुरुवातीचे काही दिवस १ तास प्रसारित केली जाणार आहे.

हेही वाचा : Video: वयाच्या ५१व्या वर्षी एसएस राजामौलींचा भन्नाट डान्स, पत्नीबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, तरुणाईला लाजवेल अशी दिग्दर्शकाची एनर्जी

२३ डिसेंबरपासून ‘झी मराठी’वर होणार बदल

२३ डिसेंबरपासून ‘झी मराठी’ ( Zee Marathi ) वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘पुन्हा कर्तव्य आहे’ आणि ‘लाखात एक आमचा दादा’ अशा तीन मालिकांच्या वेळा बदलण्यात येणार आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका ८ वाजता सुरू व्हायची आता ही मालिका रात्री १०.३० वाजता प्रसारित केली जाईल. ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही मालिका आधी ९.३० ला प्रसारित केली जायची पण, आता ही मालिका सायंकाळी ६ वाजता प्रसारित केली जाईल. याशिवाय ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका ८.३० ला लागायची, आता २३ डिसेंबरपासून ही मालिका ९.३० वाजता प्रसारित केली जाईल.

मालिकामालिका प्रसारणाची नवीन वेळ
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’रात्री १०.३०
पुन्हा कर्तव्य आहेसायंकाळी ६ वाजता
लाखात एक आमचा दादारात्री ९.३०
Zee Marathi

हेही वाचा : …तर प्राजक्ता माळीला भरायला लागणार होते कोटी रुपये, १८ टक्के व्याजासकट; ‘फुलवंती’साठी केलेला सर्वात मोठा करार, म्हणाली…

तीन मालिकांच्या वेळा बदलल्यावर सध्या १०.३० वाजता सुरू असणारी ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तर नव्याने सुरू होणारी ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका सध्या ८ ते ९ या कालावधीत प्रसारित केली जाणार असल्याच्या पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत.

दरम्यान, वाहिनीने ( Zee Marathi ) तीन मालिकांच्या वेळा बदलतील याबद्दल अधिकृत पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे. या निर्णयावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. तर, आवडत्या मालिकांच्या वेळा अचानक बदलल्याने काही प्रेक्षकांनी कमेंट्समध्ये नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, वाहिनीवर सुरू होणाऱ्या ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेकडून प्रत्येकालाच मोठ्या अपेक्षा आहेत.

Story img Loader