‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिका लागोपाठ प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसत आहेत. २०२३च्या वर्षा अखेरीस म्हणजेच डिसेंबरमध्ये ‘नवा गडी नवं राज्य’ व ‘३६ गुणी जोडी’ या मालिका ऑफ एअर झाल्या. टीआरपी कमी असल्यामुळे वाहिनीने या दोन मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. आता ‘तू चाल पुढं’ मालिका देखील लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑगस्ट २०२२मध्ये ‘तू चाल पुढं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. दीपा परब-चौधरी, आदित्य वैद्य, धनश्री काडगांवकर, प्रतिभा गोरेगावकर, देवेंद्र दोडके अशी जबरदस्त कलाकार मंडळी असलेली ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अश्विनी, श्रेयस, शिल्पी, मयुरी अशी मालिकेतील सगळी पात्र घराघरात पोहोचली. पण आता मालिका शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. लवकरच मालिका ऑफ एअर होणार आहे.

हेही वाचा – राम मंदिरासाठी दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीची मोठी घोषणा, HanuMan चित्रपटाच्या तिकिटातील पैशातून करणार ‘इतके’ दान

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री धनश्री काडगांवकरने सोशल मीडियावर शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामुळे मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं होतं. तेव्हापासून मालिकेचे प्रेक्षक नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. १३ जानेवारीला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.

हेही वाचा – Video: “काही कळायच्या आत राज ठाकरे गाडीतून उतरले अन्…”, सिद्धार्थ जाधवने सांगितला खालापूर टोलनाक्यावरील अनुभव

दरम्यान, ‘झी मराठी’ वाहिनीवरील जुन्या मालिका जरी बंद होत असल्या तरी नव्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ‘पारू’, ‘शिवा’, ‘जगद्धात्री’ या तीन नव्या मालिका लवकरच सुरू होणार आहेत. याशिवाय ‘ड्रामा Juniors’ हा नवा रिअ‍ॅलिटी शो देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या या शोसाठी ऑडिशन सुरू आहेत.