छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रियता मिळालेल्या कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणजे तुला पाहते रे. या मालिकेमुळे अभिनेता सुबोध भावेला एक वेगळी ओळख मिळाली. या मालिकेत सुबोधने विक्रांत सरंजामे ही भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री गायत्री दातारने या मालिकेत इशा निमकरची भूमिका साकारली होती. नुकतंच या मालिकेबद्दल दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या एका व्यक्तीने प्रतिक्रिया दिली आहे.

सुबोध भावेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात त्याने तुला पाहते रे ही मालिका पाहणाऱ्या एका चाहत्याच्या कमेंटवर प्रतिक्रिया दिली आहे. तुला पाहते रे ही मालिका दक्षिण आफ्रिकेत प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेबद्दल एका चाहत्याने प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी वाचा : श्रेयस तळपदेकडून नव्या चित्रपटाची घोषणा, माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी झळकणार प्रमुख भूमिकेत

mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Marathi Actress Praises Sangeet Manapman Movie
“तुम्ही South च्या बाहुबलीचं कौतुक असेल तर…”, सुबोध भावेचा ‘संगीत मानापमान’ पाहून मराठी अभिनेत्री भारावली, प्रेक्षकांना म्हणाली…
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
Karuna Munde Said Thanks to Suresh Dhas
Karuna Munde : करुणा धनंजय मुंडेंनी मानले सुरेश धस यांचे आभार; म्हणाल्या, “माझ्याकडे खूप पुरावे……”
Bhushan Prabhan
“कलाकार म्हणून आपण एकमेकांचा आदर करणं शिकलो नाही”, भूषण प्रधानकडून खंत व्यक्त; म्हणाला…

“मी सर्व दक्षिण आफ्रिकेतील लोकांतर्फे तुमचे आभार मानतो. याचे कारण म्हणजे आम्ही सर्व तुमची तुला पाहते रे ही मालिका पाहतो. या मालिकेचे भाषांतर करण्यात आले आहे. यातून खूप मनोरंजक कथा आम्हाला पाहायला मिळते. आम्हाला तुमचा आणि तुमच्या संपूर्ण टीमचा खूप खूप अभिमान वाटतो.

तुम्हाला सांगून खरं वाटणार नाही, पण मी या मालिकेचा एकही भाग चुकवत नाही. जेव्हा तुम्ही बिपीन आणि ईशा या दोघांना एकत्र पाहता आणि चिडता, तो मालिकेचा भाग मला प्रचंड आवडला. मिस्टर भावे, तुम्ही खरंच उत्कृष्ट काम केलं आहे. आम्हाला तुम्ही प्रचंड आवडता. दीर्घायुष्यी व्हा. धन्यवाद”, अशी प्रतिक्रिया या मालिकेच्या चाहत्याने दिली आहे.

subodh bhave
सुबोध भावे पोस्ट

त्यावर अभिनेता सुबोध भावेनेही प्रतिक्रिया देत चाहत्यांचे आभार मानले आहेत. “आता तुला पाहते रे ही मालिका दक्षिण आफ्रिकेतही प्रसिद्ध झाली आहे. मला दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या अनेकांकडून या मालिकेबद्दल प्रतिक्रिया देणारे मेसेज येतात”, असे सुबोधने म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री नम्रता संभेरावचे पती झळकणार चित्रपटात, नाव आले समोर

दरम्यान ‘तुला पाहते रे’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ही मालिका घराघरात लोकप्रिय ठरली होती. या मालिकेमध्ये सुबोध भावेने विक्रांत सरंजामे ही व्यक्तिरेखा साकारली. तर गायत्री दातारने इशा निमकर आणि राजनंदिनी सरंजामे या व्यक्तिरेखा उत्कृष्टरित्या साकारल्या. त्यामुळेच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली होती.

Story img Loader