‘झी मराठी’ वाहिनीवर ४ डिसेंबरला ‘जाऊ बाई गावात’ हा नवीन रिअ‍ॅलिटी शो सुरू करण्यात आला. याचं सूत्रसंचालन हार्दिक जोशी करत आहे. या कार्यक्रमाला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याने लवकरच ‘झी मराठी’वर आणखी एक शो सुरू होणार आहे. या नव्या शोमध्ये प्रेक्षकांना नेमकं काय पाहायला मिळणार? याबद्दल जाणून घेऊया…

छोट्या पडद्याचा प्रेक्षकवर्ग आजही मोठ्या प्रमाणात असल्याने मराठी वाहिन्यांमध्ये टीआरपीसाठी चढाओढ सुरू असते. संध्याकाळी ७ ते रात्री १० या वेळेत घराघरांत मालिका, रिअ‍ॅलिटी शो पाहिले जातात. टीआरपीत वाढ करण्यासाठी नवनवीन मालिका व कार्यक्रम प्रदर्शित करून प्रेक्षकांना आकर्षित केलं जातं. काही दिवसांपूर्वीच ‘झी मराठी’ वाहिनीने ‘जाऊ बाई गावात’ हा नवा शो लॉन्च केला. या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहून आता लवकरच आणखी एक नवा रिअ‍ॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा : “माझा गोड उमेश”, नवऱ्याच्या वाढदिवशी प्रिया बापटची रोमँटिक पोस्ट; म्हणाली…

‘झी मराठी’वर सुरू होणाऱ्या या नव्या रिअ‍ॅलिटी शोचं नाव ‘ड्रामा Juniors’ असं आहे. याची पहिली झलक नुकतीच प्रदर्शित करण्यात आली. परंतु, हा शो नेमका कधीपासून व किती वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती वाहिनीकडून देण्यात आलेली नाही.

हेही वाचा : “माझ्या परवानगीशिवाय माझा आवाज…”, आर्या आंबेकरने उघड केला नवीन स्कॅम, म्हणाली “गायकांनो सावधान…”

zee marathi
झी मराठी वाहिनीवर सुरू होणार नवीन शो

‘ड्रामा Juniors’ या कार्यक्रमासाठी विविध शहरात लहान मुलांच्या ऑडिशन्स घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात प्रेक्षकांना लहान मुलांच्या बहुरंगी अभिनयाची झलक पाहता येणार आहे. लवकरच वाहिनीकडून ऑडिशन्सच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. आता हा नवीन रिअ‍ॅलिटी शो कोणत्या मालिकेच्या जागी सुरू होणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Story img Loader