Zee Natya Gaurav 2024 : मराठी नाट्यविश्वात मानाचा समजला जाणारा ‘झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा’ नुकताच पार पडला. या सोहळ्याला कलाविश्वातील प्रशांत दामले, मोहन जोशी, वंदना गुप्ते, कविता मेढेकर, प्रिया बापट, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, अमृता देशमुख, वैभव मांगले, पल्लवी अजय, आशुतोष गोखले अशा अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

‘झी नाट्य गौरव पुरस्कार’ सोहळ्यात अनेक लोकप्रिय नाटकातील प्रवेशांक सादर करण्यात आले. सिद्धार्थ जाधवच्या भावुक परफॉर्मन्सने उपस्थितांचे डोळे पाणावले होते. प्रिया-उमेशचं रोमँटिक सादरीकरण असो किंवा संजन मोने-वंदना गुप्ते यांचा कॉमेडी अंदाज या सोहळ्यातील प्रत्येक परफॉर्मन्स लक्षवेधी ठरला. याशिवाय रंगदेवतेची प्रार्थना करत केलेल्या नांदीने या संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Allu Arjun
‘पुष्पा’साठी राष्ट्रीय पुरस्कार घेताना अल्लू अर्जुन दु:खी का होता? स्वत: सांगितलं कारण
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Maharashtrachi Hasyajatra Fame Actress
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का?
Jui Gadkari
Video : शूटिंगमध्ये फावला वेळ मिळताच जुई गडकरी काय करते? स्वत: व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
Border Gavaskar Trophy IND vs AUS Memorable Innings in Marathi
Border Gavaskar Trophy Best Innings: सचिन, द्रविड, पंत अन् बुमराहचा स्लोअर बॉल…, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासातील संस्मरणीय क्षण
vidya balan on sridevi
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं कौतुक करत विद्या बालनने व्यक्त केली इच्छा; म्हणाली, “मला त्यांना…”
Gautam Gambhir Backs KL Rahul With Big Statement Said How Many Teams Have a Player Like Him Border Gavaskar Trophy
Gautam Gambhir on KL Rahul: “केएल राहुलसारखे खेळाडू किती देशात आहेत?”, गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”

हेही वाचा : “आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”

प्रिया-उमेशच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचा दबदबा यंदाच्या ‘झी नाट्य गौरव’मध्ये पाहायला मिळाला. याशिवाय ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात अन्य कोणत्या कलाकारांनी बाजी मारली जाणून घेऊयात…

हेही वाचा : नवीन हॉटेल व मालिका! ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, राज ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाली…

झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा विजेत्यांची संपूर्ण यादी

१. सर्वोत्कृष्ट रंगभूषा – रितुपर्णा किर्तोनिया (प्रायोगिक नाटक-काक्षी)
२. सर्वोत्कृष्ट वेशभूषा – सई कदम, निशांत शिंदे (प्रायोगिक नाटक-रुक्मिणी)
३. सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – प्रणव सपकाळे (प्रायोगिक नाटक -कलगीतुरा)
४. सर्वोत्कृष्ट नेपथ्य – राहुल ढेंगळे, साहिल सावंत (प्रायोगिक नाटक -खुदीराम)
५. सर्वोत्कृष्ट रंगभूषा – कमलेश बिचे – चाणक्य (व्यावसायिक नाटक )
६. सर्वोत्कृष्ट वेशभूषा – नीरजा पटवर्धन – चाणक्य (व्यावसायिक नाटक )
७. सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – अमोघ फडके – जन्मवारी (व्यावसायिक नाटक )
८. सर्वोत्कृष्ट नेपथ्य -संदेश बेंद्रे – २१७ पद्मिनी धाम (व्यावसायिक नाटक )
९. सर्वोत्कृष्ट संगीत – ऋषिकेश शेलार (प्रायोगिक नाटक-कलगीतुरा)
१०. सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – निरंजन पेडगावकर (प्रायोगिक नाटक- पाच फुटाचा बच्चन )
११. सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – निनाद म्हैसाळकर – चाणक्य (व्यावसायिक नाटक )
१२. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – अनुष्का बोऱ्हाडे (प्रायोगिक नाटक – मॅड सखाराम)
१३. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सोमनाथ लिंबस्कर (प्रायोगिक नाटक – अण्णांच्या शेवटच्या इच्छा)
१४. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी अजय – जर तरची गोष्ट (व्यावसायिक नाटक )
१५. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – आशुतोष गोखले – जर तरची गोष्ट (व्यावसायिक नाटक )
१६. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री – अनिता दाते – माझ्या बायकोचा नवरा (व्यावसायिक नाटक )
१७. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता – वैभव मांगले-मर्डरवाले कुलकर्णी (व्यावसायिक नाटक )
१८. सर्वोत्कृष्ट विनोदी नाटक – मर्डरवाले कुलकर्णी
१९. सर्वोत्कृष्ट लेखन – दत्ता पाटील (प्रायोगिक नाटक) – कलगीतुरा
२०. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – मोहित टाकळकर (प्रायोगिक नाटक) – घंटा घंटा घंटा घंटा
२१. सर्वोत्कृष्ट लेखन – चिन्मय मांडलेकर – गालिब (व्यावसायिक नाटक )
२२. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – अद्वैत दादरकर, रणजित पाटील – जर तरची गोष्ट (व्यावसायिक नाटक)
२३. नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर- अमृता पवार
२४. सर्वोत्कृष्ट अनुरूप जोडी : प्रिया बापट , उमेश कामत
२५. जीवनगौरव पुरस्कार २०२४ – मोहन जोशी
२६. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – मल्लिका सिंग हंसपाल (प्रायोगिक नाटक) – घंटा घंटा घंटा घंटा
२७. सर्वोत्कृष्ट अभिनेता – ललित प्रभाकर (प्रायोगिक नाटक) – घंटा घंटा घंटा घंटा
२८. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – अमृता देशमुख – नियम व अटी लागू (व्यावसायिक नाटक )
२९. सर्वोत्कृष्ट बालनाट्य – चेरी एके चेरी
३०. विशेष लक्षवेधी प्रायोगिक नाटक – कलगीतुरा
३१. सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक – घंटा घंटा घंटा घंटा
३२. विशेष प्रबळ व्यक्तिमत्व : अनिता दाते
३३. सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक – जर तरची गोष्ट

दरम्यान, ‘झी नाट्य गौरव पुरस्कार’ मोठ्या जल्लोषात पार पडला असून सध्या कलाविश्वातून विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.