‘बिग बॉस ११’ मधील एका स्पर्धकाला सलमान खानने टीव्हीवर जाहीर धमकी दिली होती. या वादग्रस्त स्पर्धकाचे नाव झुबेर खान आहे. सलमान खान व झुबेरचं भांडण खूप गाजलं होतं. एकेकाळी सलमानला शिव्या देणारा झुबेर आज त्याला सलमान भाई म्हणतो. झुबेर त्याच्या आयुष्यात खूप अस्वस्थ आणि निराश आहे. त्याला डिप्रेशनचा त्रास आहे. सलमान खानशी पंगा घेतल्यानंतर नशिबाने साथ सोडली आणि त्याला तुरुंगात जावे लागले. तो बेरोजगार झाला, त्याच्या आईचं निधन झालं. नुकतंच एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत झुबेर खानने त्याच्या वेदना मांडल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आवडली? सुबोध भावे म्हणाला…

झुबेरने सांगितलं की, बिग बॉसमध्ये जाणे हा त्याच्या आयुष्यातील सर्वात चुकीचा निर्णय होता. या शोमधून त्याने काहीही मिळवलं नाही, पण गमावलं. “बिग बॉस आणि सलमान भाई यांनी मला कुठलंही सोडलं नाही. इंडस्ट्रीतील माझ्या एकाही मित्राने मला काम दिलं नाही. मी जवळपास इंडस्ट्रीतून बाहेर पडलो आहे. यासाठी मी सलमान खान सरांचे आभार मानतो. बिग बॉसच्या आधी माझे नशीब चांगले होते. मला लोक फोन करायचे, बिग बॉसनंतर माझ्या आईचं निधन झालं. माझा नंबर ऑनलाइन लीक केला. मी सलमान खानविरोधात तक्रार दिली, पण त्याच्या वकिलांनी मला खोट्या खटल्यात अडकवून ३ महिने तुरुंगात टाकले,” असं तो म्हणाला.

“मी राहुल गांधींची भूमिका करतोय तर…”, सुबोध भावेचे वक्तव्य; म्हणाला, “मी कुठल्या भूमिका…”

सलमानला नडणं भोवलं

पुढे तो म्हणाला, “मी तुरुंगात असताना टेन्शनमुळे माझी आई तीन महिने जेवली नाही. तिचं निधन झालं. माझ्या आईची शेवटची इच्छा होती, ती म्हणाली होती ‘बेटा, सलमान खानवर गुन्हा दाखल करू नकोस, त्याच्या आईलाही वाईट वाटेल’. आईमुळे मी तक्रार मागे घेतली, मात्र सलमान खानच्या वकिलांनी कोर्टात मला गुंड म्हटले, मी खंडणी मागतो असं सांगितलं. मी गुंड असतो तर अॅक्टिव्हा वर फिरत नसतो. आज लोक मला काम देत नाहीत. माझे मित्र म्हणतात, ‘तू सलमान खानशी पंगा घेतला आहेस’. मी जे कमावलं ते सगळं गमावलं. नाव, प्रसिद्धी, पैसा काहीच मला मिळालं नाही. माझे कुटुंबही मला परत मिळाले नाही.”

सातव्या दिवशीही ‘गदर २’ ची क्रेझ कायम, जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला; जाणून घ्या एकूण आकडेवारी

झुबेरने केले आत्महत्येचे प्रयत्न

झुबेरने सांगितले की त्याला डिप्रेशनचा त्रास आहे. गेल्या १६ वर्षांपासून तो औषधं घेतोय. “मला अनेकवेळा वाटले की मी स्वतःला फाशी द्यावी. मला वाटायचं की माझी आई सुद्धा नाहीये, मुलं-बायकोही एकत्र नाहीत, म्हणून मी आयुष्य संपवण्याचा विचार केला. आई गेल्यानंतर माझ्यासाठी सर्व काही संपलं. मी २-३ वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. दुपट्टा पंख्याला लटकवला. पण आत्महत्या करू शकलो नाही. इस्लाममध्ये हे चुकीचे मानले जाते. मला आशा आहे की एक दिवस माझी मुलं नक्कीच माझ्याकडे परत येतील. सलमान भाईच्या वक्तव्यामुळे माझ्या प्रतिमेला झालेली हानी कोणीही भरून काढू शकणार नाही,” असं झुबेर खान म्हणाला.