बॉलिवूडमधील वर्णभेद आणि घराणेशाही हा तसा जुना मुद्दा आहे. त्याची चर्चा अनेक दशकांपासून सुरु आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतसारख्या अनेक कलाकारांनी खुलेपणाने यावर त्यांचे मत मांडले होते. तर काहींनी यावर मौन बाळगणे योग्य मानले. तर आता या प्रकरणात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या नावाचाही समावेश झाला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नवाजने स्पष्टपणे सांगितले की, बॉलीवूडमध्ये घराणेशाही आणि वर्णभेद आहे. या दोन्ही गोष्टी चित्रपटसृष्टीचे कटू सत्य आहे.
“मला एक काळी अभिनेत्री दाखवा जी सुपरस्टार किंवा स्टार आहे. मी एक अभिनेता तर आहे…काळे लोक चांगला अभिनय करू शकत नाहीत का? हे आपल्या समाजातही आहे आणि तसचं बॉलिवूडमध्येही आहे. मला एक अभिनेत्री दाखवा जी काळी आहे. मी तर माझ्या जिद्दीमुळे स्टार झालो. अनेक अभिनेत्रींमध्येही ही जिद्द होती, पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या अभिनयातही ती गोष्ट असली पाहिजे,” असं नवाजुद्दीन म्हणाला.
उदाहरण देत नवाजुद्दीन म्हणाला, “ माझ्या एका नातेवाईकाला २ मुली आहेत. त्यातली एक वर्णाने काळी आणि एक गोरी आहे. जेव्हा गोरी मुलगी विनोद करायची तेव्हा लोक तिची स्तुती करायचे, परंतु जेव्हा काळी मुलगी असे करते तेव्हा ते चुप हो जा डायन असे बोलायचे. त्यामुळे समाजात आणि बॉलिवूडमध्येही वर्णद्वेष आहे हे खरं आहे. म्हणूनच मी विचारतोय की एकतरी काळी अभिनेत्री आहे का?”
पुढे नवाजुद्दीन म्हणाला, “मी इथे कुणाच्या मेहरबानीने थोडी आलो आहे. मी माझ्या जिद्दीमुळे इथे आहे आणि मुलींमध्येही जिद्द असायला हवी जेणेकरून त्या इथपर्यंत पोहोचतील. पण स्त्री किती वर्षे हट्ट धरणार, कारण बॉलीवूडमध्ये महिलांचा काळ केवळ ३५ वर्षांचा आहे. मी तर समजा १५ ते २० वर्षे संघर्ष केला.”
आणखी वाचा : या चित्रात तुम्ही सगळ्यात आधी काय पाहिले? यावरून कळेल तुमचे व्यक्तीमत्त्व
नवाजुद्दीन ‘हिरोपंती २’ या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि तारा सुतारियासोबत दिसणार आहे. याशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकी ‘जोगिरा सारा रा रा’ आणि भूमी पेडणेकरसोबत ‘अफवाह’ या चित्रपटात दिसणार आहे.