तेलगू चित्रपट अभिनेता मंचू मनोज आणि अन्य दोघेजण प्रवास करीत असलेल्या एसयुव्ही गाडीला अपघात झाल्याने ते किरकोळ जखमी झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मंचू याचा चालक गाडी चालवत होता. नरसिंगी आणि राजेन्द्रनगर क्रॉस रोड दरम्यान एका म्हशीला गाडी धडकून पलटल्याचे पोलिस निरीक्षक सी एच कुसाळकर यांनी सांगितले. या अपघातात मंचू, त्याचा अंगरक्षक आणि चालकाला किरकोळ जखमा झाल्या असून, त्यांना लगेचच रुग्णालयात नेण्यात आले. या अपघाताविषयी टि्वटरवर पोस्ट केलेल्या संदेशात मंचू म्हणतो, रस्त्यावर दिवे नसल्याकारणाने काही दिसत नव्हते. गाडीने अनेकवेळा कोलांट्या उड्या मारल्या. देवाचे आभार, कोणालाही जास्त दुखापत झाली नाही. २० मिनिटांपूर्वी आई माझ्याबरोबर गाडीत होती.

Story img Loader