दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते मोहन बाबू यांनी आपल्या करिअरमध्ये ५०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांची निर्मितीही केली आहे. आता त्यांच्याबद्दल एक बातमी समोर आली आहे. मोहन बाबू यांच्या घरात चोरी झाली आहे. त्यांच्या घरातून जवळपास १० लाख रुपये चोरीला गेले.

मोहन बाबू यांच्या घरातून १० लाख रुपये चोरी केल्याचा आरोप त्यांच्याच घरातील मदनिसावर आहे. घरातून १० लाख रुपयांची चोरी केल्याप्रकरणी या मदनिसाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. मोहन बाबू यांच्या वैयक्तिक सचिवाने रविवारी त्यांच्या घरी भेट दिली असता, खोलीत ठेवलेल्या त्यांच्या रोख रकमेची पिशवी त्याला दिसली नाही, असे पोलिसांनी सांगितले.

shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Absconding young woman arrested , woman arrested fraud case, woman fraud with builder,
पुणे : बांधकाम व्यावसायिकाची चार कोटींची फसवणूक प्रकरणात फरार झालेली तरुणी गजाआड
In Chembur young food delivery man beaten and robbed of his phone
पुणे : कामाचे पैसे मागितल्याने दोघांवर कोयत्याने वार, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक
Allu Arjun arrest, Pushpa 2 , Telangana Theater women Death ,
अशा दुर्घटनांना सेलिब्रिटींना जबाबदार धरायचे की नाही?
pune crime news
पुणे : प्रवाशांना लुटणाऱ्या तडीपार गुंडासह साथीदार गजाआड
Zakir Hussain, Zakir Hussain Kasba Peth,
तबल्याचा ठेका अन् रसिकाग्रणी काका!
Prajakta Mali reveals her struggle
…तर प्राजक्ता माळीला भरायला लागणार होते कोटी रुपये, १८ टक्के व्याजासकट; ‘फुलवंती’साठी केलेला सर्वात मोठा करार, म्हणाली…

हेही वाचा…आलिया भट्टच्या ‘जिगरा’ सिनेमाचा ट्रेलर पाहून सासूबाई नीतू कपूर म्हणाल्या, “अंगावर शहारे…”

मोहन बाबू यांच्या खासगी सचिवाने त्यांची पिशवी हरवल्याचे लक्षात आल्यानंतर पहाडीशरीफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान, आरोपी मदतनिसाला तिरुपती येथून ताब्यात घेऊन बुधवारी हैदराबादला आणण्यात आले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा…लग्नानंतर श्रीदेवी भांडायला शिकल्या होत्या, जान्हवी कपूरने केला खुलासा; वडिलांबाबत म्हणाली, “ते आधीच…”

आरोपीने अभिनेते मोहन बाबू यांच्या सचिवाच्या पिशवीतून १० लाखांची रक्कम चोरी केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीकडून ७.३६ लाख रुपये जप्त केले असून उर्वरित रक्कम त्याने खर्च केल्याचे समोर आले आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Story img Loader