तेलुगू अभिनेता लक्ष्मी मंचूने नुकतीच ‘SIIMA 2023’ या पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली. यंदाचा सोहळा दुबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये लक्ष्मी मंचूने केलेली कृती चर्चेचा विषय ठरली आहे.
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये लक्ष्मी अत्यंत ग्लॅमरस दिसत आहे. यात ती रेड कार्पेटवर मुलाखत देत आहे. ती बोलत असताना एक माणूस कॅमेऱ्यासमोर आला आणि शॉट खराब झाला. यावर लक्ष्मीला राग आला आणि तिने त्याच्या पाठीत मारलं. त्यानंतर आणखी एक जण आला आणि कॅमेऱ्याच्या समोरून जाऊ लागला. त्याला लक्ष्मी म्हणाली, “कॅमेराच्या मागे जा यार. बेसिक.” यानंतर मुलाखत घेणारी ‘कट कट’ म्हणताना दिसते.
लक्ष्मी मंचू ही अभिनेते मोहन बाबू आणि दिवंगत विद्या देवी यांची मुलगी आहे. तिने २०११ मध्ये आलेल्या ‘अनगनगा ओ धीरुडू’ या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने आतापर्यंत ‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘डब्ल्यू/ओ राम’, ‘पिट्टा कथलू’, ‘मॉन्स्टर’ आणि ‘गुंटूर टॉकीज’सह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लक्ष्मी मंचूने २००६ मध्ये अँडी श्रीनिवासनशी लग्न केले आणि त्यांना एक मुलगी आहे.