बॉलीवूडपासून टॉलीवूडपर्यंत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी इंडस्ट्रीबद्दल अनेक मोठी आणि धक्कादायक गुपिते उघड केली आहेत आणि त्यांच्यासोबत होणाऱ्या कास्टिंग काउचबद्दल खुलासे केले आहेत. त्याचबरोबर दाक्षिणात्य चित्रपटांचे दिग्दर्शिक, निर्माता आणि लेखक गीता कृष्णा यांनी नुकतेच कास्टिंग काउचबाबत असे वादग्रस्त विधान केले आहे, ज्यानंतर सोशल मीडियावरून इंडस्ट्रीतील लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. आपल्या वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत.

अलीकडेच, तेलगू दिग्दर्शक गीता कृष्णा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते कास्टिंग काउचबद्दल सांगत आहे. ‘ त्यांनी करिअरच्या सुरुवातीपासून त्यांच्या कारकिर्दीत काही बदल पाहिले आहेत का? यावर उत्तर देत ते म्हणाले, “हो पाहिलं आहे. अनेक अभिनेत्री लोकप्रियता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार होतात. जे पूर्वी तसे नव्हते.” पुढे ते म्हणाले, “अनेक अभिनेत्री हा शॉर्टकट मार्ग स्वीकारण्यात मागे हटत नाहीत”, असे ते म्हणाले.

आणखी वाचा : “मी झोपडपट्टीत वाढलोय…”, ‘हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेचे वक्तव्य चर्चेत

गीता मुलाखतीत पुढे म्हणाले की, “आजच्या काळात परिस्थिती अशी झाली आहे की फिल्म इंडस्ट्रीतील कास्टिंग काउचने हनी ट्रॅपचे रूप धारण केले आहे. आता अभिनेत्री चांगले चित्रपट मिळवण्यासाठी आणि झटपट नाव कमवण्यासाठी चित्रपट निर्मात्यांसमोर स्वतःला स्वाधीन करतात, जे हनी ट्रॅपसारखे आहे”.

आणखी वाचा : करण जोहरच्या पार्टीत सलमान आणि ऐश्वर्या आले समोरा-समोर, अन् अभिषेकने केले असे काही…

एकेकाळी अभिनेत्री श्री रेड्डीनेही कास्टिंग काउचविरोधात आवाज उठवला होता. याशिवाय बॉलिवूडपासून टॉलिवूडपर्यंत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लैंगिक शोषणाबाबत खुलासा केला आहे. रणवीर सिंग, कंगना रणौत, विद्या बालन, सुरवीन चावला, ममता कुलकर्णी, पायल रोहतगी, टिस्का चोप्रा, राधिका आपटे, स्वरा भास्कर यांच्यासह अनेक स्टार्स कास्टिंग काउचचे शिकार झाले आहेत. गीता कृष्णा ‘संकीर्तन’, ‘केचुरालू’ आणि ‘कोकिला’ सारखे चित्रपटांसाठी
ओळखले जातात.

Story img Loader