Telugu Actor Sudheer Varma Death : तेलुगू चिपत्रपट सृष्टीतील अभिनेता सुधीर वर्माने (३३) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र वर्माने विशाखापट्टनम येथील आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. सुधीर वर्माच्या कुंडानापू बोम्मा (Kundanapu Bomma) चित्रपटातील सहकलाकाराने वर्माच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुधीर वर्माने स्वामी रा रा (Swamy Ra Ra ) या चित्रपटाच्या माध्यमातून २०१३ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. कुंडानापू बोम्मा (२०१६) या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत होता. सुधीर वर्माने आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांत काम केले. मात्र कुंडानापू बोम्मा या चित्रपटामुळे सुधीरला वेगळी ओळख मिळाली.

सुधीर वर्माने नेक्कू नाकू डॅश डॅश, सेकंड हँड या चित्रपटांतही महत्त्वाची भूमिका केली होती. मात्र मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून त्याला मनासारखे काम मिळत नव्हते. असे असले तरी वर्माच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telugu film actor sudheer varma committed suicide on monday prd