अभिनेता आणि सगळ्यात तरुण सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्कार पटकावणा-या तेलगू अभिनेता उदय किरणने ऱविवारी रात्री आत्महत्या केली. त्याला रुग्णालयात नेताच तेथील डॉक्टरांनी तो मृत पावल्याचे घोषित केले.
श्रीनगर कॉलनीतील राहत्या घरी उदयच्या आई-वडिलांना आणि पत्नीला तो गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर त्याला लगेचच रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवलेली होती. पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) व्ही सत्यनारायणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आत्महत्येचे प्रकरण असून, हा अभिनेता काही दिवस झाले उदासीन जीवन जगत होता.
चित्रम, नुव्वू नेनू आणि मनसंथा नुव्वू या चित्रपटांमुळे उदयला हॅट्रिक हिरो हे टायटल मिळाले होते. २००६ साली त्याने पोइ या तमिळ चित्रपटाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
तेलगू अभिनेता उदय किरण याची आत्महत्या
अभिनेता आणि सगळ्यात तरुण सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्कार पटकावणा-या तेलगू अभिनेता उदय किरणने ऱविवारी रात्री आत्महत्या केली.
First published on: 06-01-2014 at 10:53 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telugu film actor uday kiran found dead suicide suspected