तेलुगू सुपरस्टार प्रभास हा चांगलाच चर्चेत असतो. ‘बाहूबली’च्या यशानंतर तो जणू तरुणांच्या गळ्यातील ताईतच बनला आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाकडे लोक खूप आतुरतेने पाहू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी ‘आदिपुरुष’ चित्रपटातील टीजरमुळे तो पुन्हा चर्चेत आला. चित्रपटाला प्रेक्षकांनी विरोध दर्शवला असला तरी त्यांना प्रभासचा लूक आवडला.

या चित्रपटात प्रभासबरोबर सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री क्रीती सनॉन दिसणार आहे. यामुळेच प्रभास गेले काही दिवस चर्चेत आहे. प्रभास आणि क्रीती हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचं वृत्त समोर आलं होतं. यावर अजून दोघांनी काहीच स्पष्टीकरण दिलेलं नाही. नुकतंच प्रभासने लग्न करण्याबद्दल वक्तव्य केलं आहे. प्रभासने लग्न कुणाशी करणार असल्याचं नव्हे तर कधी करणार असल्याचं उत्तर दिलं आहे.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर

आणखी वाचा : Pathaan Controversy : “त्यांना हिजाब खटकतो…” भगव्या बिकिनी वादावर नुसरत जहाँ यांचं वक्तव्य चर्चेत

तेलुगू स्टार प्रभास लवकरच नंदामुरी बालकृष्णाच्या टॉक शो ‘अनस्टॉपेबल २’ मध्ये दिसणार आहे. नुकताच या एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यात प्रभास भरपूर धमाल करताना दिसत आहे. या कार्यक्रमात प्रभासला त्याच्या खासगी आयुष्यातील बरेच प्रश्न विचारण्यात आले आणि त्यांची त्याने मानमोकळेपणे उत्तरं दिली.

याच दरम्यान प्रभास लग्न कधी करणार हा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर प्रभासने हसत उत्तर दिलं की, “आधी सलमान खानला लग्न करू द्या, मग मी करेन.” प्रभासच्या या उत्तरावर सगळे मनमुराद हसले. प्रभास आणि क्रीती हे एकमेकांना डेट करत आहेत या अफवा बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या एका वक्तव्यामुळे पसरल्या होत्या. त्यावर मात्र प्रभासने अद्याप स्पष्टीकरण दिलेलं नाही.

Story img Loader