निखिल अडवानी दिग्दर्शित नवा ‘हीरो’ पाहिल्यावर पहिल्या ‘हीरो’ची दहा वैशिष्ट्ये अधिकच ठळकपणे जाणवतात…
१. दिग्दर्शक सुभाष घईंचा हा सातवा चित्रपट होता. याच चित्रपटापासून त्यांनी ‘मुक्ता आर्टस्’ ही आपली चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली.
२. ‘कालीचरण’, ‘विश्वनाथ’, ‘गौतम गोविंदा’, ‘क्रोधी’, ‘विधाता’ आणि ‘कर्ज’ हे चित्रपट सुभाष घईंनी अन्य निर्मात्यांसाठी दिग्दर्शित केले होते. ‘विधाता’चे निमार्ता गुलशन रॉय हे बडे प्रस्थ होते.
३. जॅकी श्रॉफला देव आनंद यांनी ‘स्वामी दाद’मध्ये खलनायकाची भूमिका देत चित्रपटात आणले, तर मनोजकुमारने ‘पेन्टर बाबू’मध्ये मीनाक्षी शेषाद्रीला राजीव गोस्वामीची नायिका करीत चित्रपटात आणले. या दोघांना सुभाष घईंनी ‘हिरो’मध्ये एकत्र आणले.
४. ‘हिरो’ १९८३ च्या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रदर्शित झाला, त्याच्या दोनच दिवसापूर्वी न्यू एक्सलसियरच्या चौथ्या मजल्यावरील मिनी चित्रपटगृहातील आम्हा समीक्षकांच्या खेळाला खुद्द जॅका श्रॉफ हजर होता.
५. तत्कालिन चित्रपट समीक्षकाना हा भरपूर मसाला असणारा चित्रपट आवडला नव्हता. पटकथाकार राम केळकर यांनी यामध्ये प्रेम, त्याग, गुन्हा, योगायोग, कायदा, आणि विरह असा सर्वच प्रकारचा मसाला रंगवला होता.
६. मुख्य चित्रपटगृह हा तेव्हाचा महत्त्वाचा फंडा होता. ‘हिरो’चे मुख्य चित्रपटगृह ताडदेवचे ‘गंगा’ होते. तिसऱ्या आठवड्यापासून गर्दी वाढू लागली, ती अशी वाढली की रौप्यमहोत्सवी आठवडा कधी आला तेच समजले नाही.
७. आनंद बक्षींची गीते आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत प्रचंड लोकप्रिय झाले आणि राम केळकर यांची पटकथा रंगतदार ठरू लागली. ‘निंदिया से जागी बहार’, ‘डिंग डाँग ओ बेबी सिंग अ साँग’, ‘तू मेरा जानू हैं… तू मेरा दिलबर हैं’, ‘हाय लम्बी जुदाई’, ‘प्यार करने वाले कभी डरते नही…’ अशी गाणी आजही लोकप्रिय आहेत.
९. ‘संबंध’ आणि ‘मनोरंजन’ या चित्रपटानंतर शम्मी कपूर आणि संजीव कुमार या चित्रपटात एकत्र दिसले. ‘मनोरंजन’चे दिग्दर्शन शम्मी कपूर यांचे होते.
१०. तो ‘हिरो’ एका पिढीचे वेड ठरला. ती रंगत सूरज पांचोली आणि अथिया शेट्टीच्या ‘हिरो’ला नाही. विस्कळीत पटकथा आणि संकलनाची गोची यात हा ‘हिरो’ फसला आहे.
– दिलीप ठाकूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा