आठवड्याभरापासून सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यातच कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराची स्थिती आणखीनच गंभीर झाली आहे. याठिकाणी एनडीआरएफ, नौदल आणि लष्कराचं पथक स्थानिक तरुणांच्या सहाय्याने या भागात मदतकार्य करत आहेत. त्यासोबतच अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. तर काही जण सोशल मीडियाच्या माध्यमातून येथील नागरिकांसाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत. त्यातच गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यानेदेखील ट्विट करत येथील नागरिकांसाठी प्रार्थना केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“कोल्हापूरातील माझ्या पुरग्रस्त बांधवांना परिस्थितीशी सामना करण्याची ताकद देवो आणि लवकरात लवकर माझं कोल्हापूर पूर्ववत होवो, हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना”, असं म्हणत अवधूतने कोल्हापूरच्या महालक्ष्मीला साकडं घातलं आहे.

दरम्यान, पंचगंगा नदी बुधवारी धोकापातळीपेक्षा १३ फूट अधिक उंचीवरून वाहात होती. तर अन्य नद्यांनी महापुराचा नवा विक्रम नोंदवला. या नद्यांचे पाणी कोल्हापूर शहराबरोबरच नदीकाठच्या शेकडो गावांमध्ये शिरलं आहे. यामुळे हजारो घरे पाण्याखाली गेली आहेत. एनडीआरएफ, नौदल, लष्करासह स्थानिक तरुणांनी या भागात मदतकार्य सुरू केले आहे.