महाराष्ट्रातल्या राजकारणातला वाघ असं ज्यांचं वर्णन केलं जातं त्या बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यावर ठाकरे नावाचा सिनेमा येतो आहे. या सिनेमात बाळासाहेब ठाकरेंची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारली आहे. सिनेमा जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे मात्र या सिनेमाचा ट्रेलर २६ डिसेंबरला पाहायला मिळणार आहे. याच संदर्भातला एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. ज्यामध्ये मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी सांगितल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आम्ही जेव्हा शिवाजी पार्कवर क्रिकेटचा सराव करायचो आणि बाळासाहेब ठाकरे यांची जर तिथे सभा होणार असेल तर लोकांमध्ये एक निराळाच उत्साह असे. ते सगळं वातावरणच भारलेलं असे. भाषण ऐकण्यासाठी लोक आतूर व्हायचे त्यांच्या भाषणाची तयारी अत्यंत उत्साहात चालत असे अशी आठवण सचिनने सांगितली आहे. सचिनने त्यांच्या भेटीच्या आठवणी सांगितल्या आहेत. मी जेव्हा जेव्हा बाळासाहेब ठाकरेंची भेट घ्यायचो तेव्हा बाळासाहेब सांगायचे देशाला गौरव वाटेल असाच खेळ कर. मी त्यांचे हे शब्द आशीर्वादाप्रमाणेच मानायचो आणि तसा खेळ करायचा प्रयत्न करायचो असेही सचिनने म्हटले आहे.

याच स्पेशल व्हिडिओमध्ये खासदार संजय राऊत, अभिनेता अजिंक्य देव आणि इतर काही शिवसैनिकांच्या प्रतिक्रियाही दाखवण्यात आल्या आहेत. हे सगळेजण बाळासाहेब ठाकरे हा काय करीश्मा होता ते सांगताना दिसत आहेत. या सगळ्या प्रतिक्रियांच्या दरम्यान बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणामधले काही अंशही व्हिडिओत दिसत आहेत. ठाकरे या सिनेमाचा ट्रेलर २६ डिसेंबरला येणार असल्याने या संदर्भातला हा स्पेशल व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरेंचा आवाज हा सत्यासाठी आणि हक्कासाठी होता असे अभिनेता अजिंक्य देव सांगतो आहे. महिला आणि त्यांचा आवाज ही शिवसेनेची ताकद आहे असे बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगत अशी आठवण एका शिवसेना महिला कार्यकर्तीने सांगितली आहे. या व्हिडिओला युट्यूबवर चांगलेच लाइक्स आणि शेअर्स मिळत आहेत. आता ठाकरे सिनेमाचा ट्रेलर कसा असणार? याचीही उत्सुकता ताणली गेली आहे.

पाहा व्हिडिओ 