संसदेने मंजुरी दिल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) केंद्र सरकारने सोमवारी लागू केला. त्यासंदर्भातील अधिसूचना काढण्यात आली असून लोकसभा निवडणुकीसाठी महिनाभराचा कालावधी उरला असताना केंद्राने हा अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०१९ मध्ये ‘सीएए’विरोधात देशभर हिंसक आंदोलने झाली होती. त्यावेळी बऱ्याच सेलिब्रिटीजनीदेखील याला चांगलाच विरोध केला होता.

आता हा कायदा लागू झाल्यावर तमिळ अभिनेता आणि ‘तमिलागा वेट्री कडगम (टीवीके)’ पार्टीचा नेता थलपति विजय याने सीएए विरोधात भाष्य केलं आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या निवेदनात थलपथी विजय म्हणाला की, “सीएएची अंमलबजावणी मान्य नाही. ज्या वातावरणात देशातील सर्व नागरिक सामाजिक एकत्र आनंदाने रहात आहेत, तेथे भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ (CAA) सारख्या कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी आम्हाला मान्य नाही.”

Mehkar Assembly constituency shinde shiv sena thackeray shiv sena Siddharth Kharat Sanjay Raimulkar buldhana district
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे-ठाकरे गटांत सामना, संजय रायमूलकर यांची घोडदौड सिद्धार्थ खरात रोखणार?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha election 2024 opposition united against ravi rana
लक्षवेधी लढत : रवी राणा यांच्याविरोधात सारे एकवटले
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा
maharashtra assembly election 2024 ramtek nagpur rebellion in one constituency party loyalty in another Congress MP ex minister in rebel campaign
एका मतदारसंघात बंडखोरी, दुसऱ्यामध्ये ‘पक्षनिष्ठा’; काँग्रेस खासदार, माजी मंत्री बंडखोराच्या प्रचारात
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी

आणखी वाचा : ‘JNU’वर लवकरच येणार चित्रपट; रवी किशन आणि उर्वशी रौतेला यांच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

हा कायदा तामिळनाडूमध्ये लागू करू नये, अशी विनंती विजयने तामिळनाडू सरकारला केली. या कायद्याची तामिळनाडूमध्ये अंमलबजावणी होणार नाही याची राजकारण्यांनी खात्री करावी, असेही विजयने त्याच्या निवेदनात नमूद केले आहे. विजय व्यतिरिक्त, इतर विरोधी नेत्यांनीही नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याचे नियम अधिसूचित केल्याबद्दल केंद्र सरकारवर टीका केली आहे. तसेच भाजप निवडणुकांपूर्वी समाजात फूट पाडण्याचा आणि वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री यांनीही या कायद्याचा विरोध केला आहे. भाजपने २०१९च्या लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यात ‘सीएए’चे आश्वासन दिले होते. त्यानुसार, २०२४ च्या निवडणुकीआधी या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. गेल्या महिन्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभर ‘सीएए’ लागू केला जाणार असल्याचे जाहीर केले होते. सीएएमुळे देशातील मुस्लिमांना लक्ष्य केले जाण्याचा धोका असल्याचा मुद्दा उपस्थित करत विविध राज्यांमध्ये या कायद्याला तीव्र विरोध झाला होता. देशभर हिंसक विरोध होऊ लागल्यामुळे केंद्र सरकारने कायद्याची अंमलबजावणी लांबणीवर टाकली होती.