GOAT Box Office Collection Day 1: दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजयचे (Thalapathy Vijay) तमिळ सिनेमात मोठे चाहते आहेत. रजनीकांत, कमल हासन यांच्या नंतर थलपती विजय हे दक्षिणेतील मोठं नाव आहे. थलपती विजयचे चाहते केवळ तमिळनाडूत नसून, भारताच्या दक्षिणेस पसरलेल्या राज्यांसह संपूर्ण भारतात आहेत. त्याचे ‘मास्टर’, ‘लिओ’, ‘बीस्ट’ या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत अनेक विक्रम केले आहेत. त्याचा नवा सिनेमा ‘गोट’ (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) आज ५ सप्टेंबर २०२५ ला प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने सुद्धा त्याच्या इतर सिनेमांप्रमाणे कोट्यवधींची कमाई केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉक्स ऑफिस ट्रॅकिंग पोर्टल सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘गोट’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी भारतात १८.२ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये चाहत्यांनी दिलेल्या अफाट प्रतिसादामुळे हा सिनेमा जगभरात प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १०० कोटींची कमाई करेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. या सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून २४ कोटींची कमाई झाली आहे. त्यापैकी जवळपास २२.८३ कोटींची कमाई एकट्या तमिळ टूडी स्क्रीन असणाऱ्या सिनेमागृहांमधून झाली आहे. तमिळ आयमॅक्स टूडी स्क्रीन्समधून उर्वरित ३० लाख रुपयांचं अ‍ॅडव्हान्स बुकिंग करण्यात आलं आहे. ‘गोट’ने तेलुगू आणि हिंदी भाषेत अनुक्रमे ८५.६२ लाख आणि ५०.५२ लाख रुपयांची कमाई केली आहे. तमिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यात या सिनेमाची मोठ्या प्रमाणावर अ‍ॅडव्हान्स बुकिंग झाली आहे.

हेही वाचा…शाहरुखनंतर अ‍ॅटलीच्या नव्या सिनेमात झळकणार सलमान खान आणि कमल हसन, ‘या’ महिन्यापासून चित्रीकरणाला होणार सुरुवात

गोटच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच कोट्यवधींची कमाई

चित्रपटाने पहिल्याच दिवशी अ‍ॅडव्हान्स तिकीट विक्रीतून ११ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ब्लॉक केलेल्या जागांसह हा आकडा १४.६ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या एकूण पैकी ११.२ कोटी रुपये तमिळ भाषिक भागातून आले आहेत, जिथे तिकीटांची सरासरी किंमत २०८ रुपये होती. तेलुगू भाषिक प्रदेशांमध्ये तिकिटांची विक्री आतापर्यंत ७ लाख रुपयांवर पोहोचली आहे.

अमेरिकेत ‘गोट’ने तिकीट विक्रीतून ५.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. या विक्रीने विजयच्या ‘बीस्ट’ सिनेमाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला मागे टाकलं आहे. विजयने सातासमुद्रापार सिनेमाच्या कमाईत उच्चांक गाठला असला तरी उत्तर भारतात त्याला मर्यादित कमाई करता आली आहे. दिल्ली एनसीआर प्रदेशात अ‍ॅडव्हान्स तिकीट विक्रीचे आकडे २ लाखांपेक्षा कमी आहेत.

हेही वाचा…सुपरस्टार रजनीकांत, नागार्जुन अन् ‘बाहुबली’ फेम सत्यराज; ‘या’ चित्रपटात दाक्षिणात्य दिग्गजांची मांदियाळी, पोस्टर प्रदर्शित

जबरदस्त अ‍ॅक्शन आणि स्पाय थीम

‘गोट’ सिनेमात जबरदस्त अ‍ॅक्शन आहे. या सिनेमात विजय एका गुप्तहेराच्या भूमिकेत आहे आणि तो या सिनेमात अनेक स्टंट करताना दिसतोय. ‘गोट’मध्ये अभिनेता, दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर प्रभुदेवा आहे. यात विजय नेहमीप्रमाणे त्याच्या राऊडी लूकमध्ये दिसतोय, आणि तो सिनेमात दुहेरी भूमिका साकारतोय.

‘गोट’ ठरेल ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम ब्लॉकबस्टर?

आतापर्यंत ‘गोट’ने वर्ल्डवाइड अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये बुधवारपर्यंत ५० कोटींची कमाई केली आहे. हा आकडा ६० ते ७० कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या आकड्यांवरून सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई १०० कोटींचा आकडा गाठण्यास सज्ज आहे. हा आकडा विजयच्या ‘लिओ’ (१४२ कोटी) ओपनिंग डेच्या कमाईपेक्षा कमी असला तरी ‘गोट’ हा सिनेमा जागतिक बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी १०० कोटी कमावणारा विजयचा दुसरा सिनेमा ठरू शकतो.

हेही वाचा…“माझे अवयव निकामी झाले असते”, अभिनेता विक्रमने सांगितला अनुभव; म्हणाला, “मी जेव्हा…”

सिनेमाला रामराम, राजकारण एकमेव काम

थलपती विजयने काही महिन्यांपूर्वीच सिनेमाला कायमचा रामराम करण्याची घोषणा केली होती. त्याने ‘तमिझगा वेत्री कळघम’ म्हणजेच ‘तमिळनाडू विजय पार्टी’ या पक्षाची स्थापना केली आहे आणि तो यापुढे फक्त राजकारण करणार असल्याचे सांगितले आहे. ‘गोट’ आणि एक नाव न ठरलेला सिनेमाच शुटींग झाला की, तो सिनेसृष्टीला कायमचा रामराम करणार अस विजयने जाहीर केलं होत. राजकारण हा त्याचा केवळ छंद नाही, तर त्यात काम करण्याची तीव्र इच्छा आहे. त्याला स्वतःला यात पूर्णपणे झोकून द्यायचं आहे, म्हणूनच यापुढे तो सिनेमात काम करणार नाही, असं त्याने सांगितलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thalapathy vijay goat movie massive openings in india and worldwide see all numbers of collections psg