थलपती विजय तमिळ सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. विजय आता अभिनय सोडून कायमचा राजकारणात जाणार आहे. त्याने यासंदर्भात आधीच घोषणा केली आहे. विजयने ही घोषणा करण्यापूर्वी जेवढे चित्रपट साईन केले होते, तेवढे तो करणार आहे. त्यानंतर अभिनयाला कायमचा रामराम करून तो राजकारणात स्थिरावणार आहे, असं त्यानेच सांगितलं आहे. थलपतीचा नुकताच ‘GOAT’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा त्याचा शेवटून दुसरा सिनेमा आहे, म्हणजेच यानंतर तो प्रेक्षकांना त्याच्या आगामी चित्रपटात अखेरचा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल.

rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड
average speed of freight trains over previous 11 years barely 25 kilometers per hour
अवघा २५ किलोमीटर सरासरी वेग… मालगाड्यांचा वेग कमी झाल्याने मालवाहतुकीवर परिणाम होत आहे का?
Bangladeshi infiltrators Dhule, Four Bangladeshi infiltrators arrested, Bangladeshi infiltrators,
धुळ्यातून चार घुसखोर बांगलादेशी ताब्यात
Chetak Festival, Horse Sarangkheda Chetak Festival,
अबब…सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमध्ये १९ कोटींचा घोडा
devendra fadnavis speech in assembly
Devendra Fadnavis Video: देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सांगितला ७६ लाख अतिरिक्त मतांचा हिशेब; म्हणाले, “६ वाजेनंतर…”
Dog Killed Crocodile Animal Video Viral Dog Fight With Crocodile Who Will Win Watch This Video Till End
VIDEO: “हिम्मतीपुढं सगळं शक्य” मगरीनं कुत्र्याला जबड्यात पकडला मात्र ५ सेकंदात डाव पलटला; लढाईचा शेवट पाहून तुम्हीही व्हाल हैराण

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाणारा अभिनेता थलपती विजयचा गोट सिनेमा ५ सप्टेंबरला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जबरदस्त ओपनिंग केली होती. त्यानंतर त्याच्या कमाईत थोडी घसरण झाली पण रविवारी पुन्हा एकदा चित्रपटाने चांगले कलेक्शन केले. सिनेमाने पहिल्या दिवशी जगभरात तब्बल ४३ कोटींची कमाई केली होती.

हेही वाचा- मुंबईत २० कोटींमध्ये घेतलेला बंगला कंगना रणौत यांनी ‘इतक्या’ कोटींना विकला, कोणी केला खरेदी? जाणून घ्या

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ‘गोट’ या दाक्षिणात्य सिनेमाने चौथ्या दिवशी ३४.२ कोटींची कमाई केली आहे. चार दिवसात या चित्रपटाचे एकूण कलेक्शन २८५ कोटी झाले आहे. विजयच्या या सिनेमाला फक्त तामिळमध्येच नाही तर संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच प्रेक्षकांनी सिनेमाचं प्रिबुकींग केलं होतं. विजयच्या सिनेमाला या अमेरिकेतील प्रेक्षकांचादेखील भरभरुन प्रतिसाद मिळत आहेत.

हेही वाचा- Video : अंकिता लोखंडेच्या घरी बाप्पा विराजमान, फुगडी घालत ‘अग्निपथ’मधील गाण्यावर धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल

या सिनेमात थलपती विजय याने एका गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. गोट (GOAT) म्हणजेच ‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ या सिनेमाचं दिग्दर्शन व्यंकट प्रभू यांनी केलं आहे. या सिनेमात थलपती विजय बरोबर प्रभु देवा, स्नेहा, अजमल अमीर, वैभव, लैला, मोहन, अरविंद आकाश, अजय राज, मीनाक्षी चौधरी, योगी बाबू हे कलाकर मंडळी देखील मुख्य भूमिकेत आहे. प्रेक्षकांचा विजयच्या ‘गोट’ सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहता स्त्री २ नंतर बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा ठरेल, अशी चिन्हं दिसत आहेत.

Story img Loader