बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अजय देवगण. गेली अनेकवर्ष सातत्याने तो आपल्याला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसत आहे. ‘सिंघम’ मधला कर्तव्यदक्ष अधिकारी असो, ‘तान्हाजीमधला’ मर्द मावळा किंवा ‘दृश्यम’ चित्रपटातील कुटुंबाला सांभाळणारा पिता असो, अजय देवगणने कायमच आपल्या अभिनयनातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अजय देवगण सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो. नुकतेच त्याचे ‘आर आर आर’ आणि ‘रनवे ३४’ चित्रपट प्रदर्शित झाले होते.

अजय देवगण यांनी आपल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे ती म्हणजे अजय देवगणच्या आगामी ‘थँक गॉड’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. अजय देवगण याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीत सिंग देखील रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अजय देवगण सिंहासनावर बसलेला दिसत आहे. काळ्या रंगाच्या सूटमध्ये अजय देवगण शोभून दिसत आहे. सुरु आहे. अजय देवगणनेही ट्विट करून चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चची तारीख दिली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे.अजयने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘या दिवाळीला चित्रगुप्त तुमच्या कुटुंबासोबत खेळ खेळायला येत आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
kiran gaikwad and vaishnavi kalyankar mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘देवमाणूस’ फेम अभिनेता बोहल्यावर चढणार; होणारी पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, पाहा व्हिडीओ
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”

“…तर मी घर सोडेन” प्रसिद्ध अभिनेत्रीशी अफेअरच्या चर्चांमुळे काजोलने अजयला दिली होती धमकी

थँक गॉड हा विनोदी चित्रपट असणार आहे. इंद्र कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट २५ ऑक्टोबरला म्हणजेच दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपासून अजय आणि तब्बू त्यांच्या आगामी ‘भोला’ या चित्रपटामुळे चर्चेचा केंद्रबिंदू आहेत. या चित्रपटाच्या घोषणेपासून याची प्रेक्षकवर्गात उत्सुकता होती. गेले अनेक दिवस या चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. अखेर नुकतेच अजय आणि तब्बूने ‘भोला’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

अजय देवगणचे खाजगी आयुष्य देखील चर्चेत असते. अजय देवगण आणि काजोल बॉलिवूडच्या आदर्श आणि लोकप्रिय जोड्यांपैकी एक १९९५ मध्ये ‘हलचल’ चित्रपटाच्या दरम्यान अजय आणि काजोलची पहिली भेट झाली होती. अजय आणि काजोलने चार वर्ष एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अजयच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नासाठी होकार दिला होता.

Story img Loader