शबाना आझमी, करण जोहर आणि बिपाशा बासूसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी शुक्रवारी शिक्षक दिनानिमित्त त्यांच्या जीवनाच्या जडण-घडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या त्यांच्या पालकांचे, शिक्षकांचे आणि अन्य मार्गदर्शकांचे आभार मानले. सेलिब्रिटींचे या संदर्भातले टि्वटस् –

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लता मंगेशकर – नमस्कार तुम्हा सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

शबाना आझमी – शिक्षक दिनाच्या दिवशी माझ्या सर्व शिक्षकांना अभिवादन, खास करून रोशन तनेजा ज्यांनी मला एफटीआयआयमध्ये अभिनयाचे धडे दिले. ज्यांच्यामुळे मी प्रत्येकदिवशी शिकत आहे.

माधुरी दीक्षित – जगभरातील सर्व शिक्षकांना हॅपी टिचर्स डे. त्यांच्याविषयी माझ्या मनात कमालीचा आदर आणि प्रेम आहे!

करण जोहर – पालकांनी माझ्यावर जे चांगले संस्कार केले त्यासाठी त्यांचे धन्यवाद. चित्रपटाविषयी मला सर्वकाही शिकविल्याबद्दल आदित्य चोप्राचेदेखील आभार. हॅपी टिचर्स डे

मधुर भांडारकर – मला प्रेरणा देणारे आणि जीवन जगण्याची कला, तसेच प्रगतीचा मार्ग दाखविणाऱ्या सर्वांना हॅपी टिचर्स डे.

दिव्या दत्ता – माझे सर्व शिक्षक आणि ज्यांनी मला आयुष्यात काही ना काही शिकवले… त्या सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.

राहूल बोस – गमतीदार, प्रेरणादायी, दयाळू, ऊर्जेने भरलेले आणि गरीब इत्यादी अनेकप्रकारचे शिक्षक मला होते. सर्वांकडून काही ना काही शिकलो.

बिपाशा बासू – शिक्षकदिनी मी भावूक होते. पत्राली सरकार ह्या इंग्रजीच्या शिक्षिका माझ्या आवडत्या होत्या. आज आम्ही जे काही आहोत त्यात त्यांचे योगदान खूप महत्वाचे आहे. शिक्षक तुम्हाला धन्यवाद.

राम कपूर – सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. तुमचे कार्य खऱ्या अर्थाने महान कार्य आहे.

उदय चोप्रा – माझ्या शिक्षणात ज्या शिक्षकांचे योगदान राहिले आहे, असा सर्व शिक्षकांना धन्यवाद. मित्र आणि गुरू अनुपम खेर यांना खास धन्यवाद

कुणाल कोहली – हॅपी टिचर्स डे यश चोप्रा, राज कपूर, गुरुदत्त, बिमल रॉय, विजय आनंद, रमेश सिप्पी, मनोज कुमार, राज खोसला, प्रकाश मेहरा आणि महेश भट्ट

सोफिया चौधरी – प्रिय आई मला घडविण्यासाठी आणि माझ्यात सामर्थ्य, सकारात्मक दृष्टी, स्पष्टवक्तेपणा आणण्यासाठी धन्यवाद. मला प्रेरणा देण्यासाठी निरज कबीचे आभार. आयुष्यात उत्तम शिक्षकाची भूमिका निभावल्याबद्दल जीवनाचेदेखील धन्यवाद!

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thank you for classroom life lessons b town on teachers day