मराठी चित्रपटाच्या एकूणच चौफेर, गौरवशाली, अष्टपैलू वाटचालीमध्ये महेश कोठारे यांच्या चित्रपटांचेही विशेष स्थान आहे. त्यांच्या धूमधडाका पासूनच्या यशाची चढती कमान साधणाऱया प्रवासातील थरथराट हा देखील महत्त्वाचा चित्रपट.  
१९८९ साली झळकलेल्या या चित्रपटाचे आता रौप्य महोत्सवी वर्ष सुरू आहे. महेश कोठारे यांच्या थरथराट या चित्रपटाचे दिग्दर्शन अरविंद सामंत यांच्या श्री अष्टविनायक चित्र या बॅनरखाली केले होते. या चित्रपटाची कथा महेश कोठारे यांचीच होती, तर पटकथा वसंत साठे व महेश कोठारे यांची होती. वसंत साठे हे राज कपूर यांच्या देखील चित्रपटांचे पटकथाकार राहीले आहेत. ‘थरथराट’च्या निमित्ताने त्यांनी प्रथमच मराठी चित्रपटाची पटकथा लिहीली. थरथराट चे चुरचुरीत, मार्मिक व मिश्किल संवाद शिवराज गोर्ले यांनी लिहीले होते. चित्रपटाची गीते प्रवीण दवणे यांची तर संगीत अनिल मोहिले यांचे होते.
या थरार व विनोद यांचे मिश्रण असणाऱया चित्रपटात महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता जोशी, जयराम कुलकर्णी, दीपक शिर्के, राहुल सोलापूरकर, भालचंद्र कुलकर्णी व अंबर कोठारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील चिकीचिकी बुबुम बुम हे गाणे खूप लोकप्रिय झाले. हा चित्रपट तेव्हा मुंबईत गिरगावातील सेन्ट्रल सिनेमा, दादरचे प्लाझा इत्यादी ठिकाणी झळकला. लक्ष्मीकांत बेर्डे तेव्हा मराठीतील सुपरस्टार म्हणून ओळखला जात होता. त्याचा स्वत:चा हुकमी चाहता वर्ग आणि महेश कोठारे यांच्या पारंपारिक लोकप्रिय चित्रपटाच्या मनोरंजनाची हमी यामुळे चित्रपटाचे अर्धे यश हुकमी होते, तर चित्रपटाच्या दर्जाचे त्या यशात वाढ केली आणि चित्रपट घवघवीत यशस्वी ठरला. त्यांच्या रौप्य महोत्सवी वर्षाला शुभेच्छा द्यायलाच हव्यात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा