न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर neuroendocrine tumour या आजाराने ग्रस्त असलेल्या अभिनेता इरफान खानला बॉलिवूडमधून अनेक कलाकारांची साथ मिळत आहे. एकीकडे त्याचा आगामी ‘ब्लॅकमेल’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे, पण आजारामुळे तो प्रमोशनमध्ये सहभागी होऊ शकत नाही आहे. त्याच्यासाठी आता बॉलिवूडचे तिन्ही खान म्हणजेच सलमान, शाहरुख आणि आमिर पुढे सरसावले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान हे तिघंही इरफानच्या ‘ब्लॅकमेल’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला एकत्र हजेरी लावणार आहेत. ६ मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची विशेष स्क्रिनिंग या तिघांसाठी आयोजित करण्यात आली आहे आणि यामध्ये तिघंही मिळून इरफानच्या चित्रपटाचं प्रमोशन करतील.

वाचा : अवघे ५०० रुपये घेऊन मुंबईत करिअरसाठी आली होती दिशा पटानी

आपण एका दुर्धर आजाराने ग्रस्त आहोत, असं ट्विट इरफानने गेल्या महिन्यात केलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी त्याने त्याच्या आजाराविषयी सोशल मीडियावरून माहिती दिली. या आजारावर उपचार करण्यासाठी मला परदेशात जावं लागतंय, असंही त्याने म्हटलं होतं. या कारणास्तव चित्रपटाचं प्रमोशन तो करू शकत नाहीये आणि त्याच्या मदतीला बॉलिवूडचे हे तीन सुपरस्टार धावून आले आहेत.

इरफान आणि किर्ती कुल्हारी यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘ब्लॅकमेल’ चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. इरफान लवकरात लवकर बरा व्हावा आणि आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून पुन्हा एकदा चित्रपट गाजवण्यास सज्ज व्हावा अशीच चाहत्यांची इच्छा आहे.