बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘कॉफी विथ करण’ हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हा शो संपला अशी चर्चा सुरु होती. पण आता हा या शोचा ७ वा सीझन Disney Plus Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे. या शोमध्ये कोण कोणते सेलिब्रिटी हजेरी लावणार याची प्रतिक्षा प्रेक्षक करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतीच या शोमध्ये कोणते सेलिब्रिटी हजेरी लावणारी याची माहिती समोर आली आहे. याशोमध्ये बॉलिवूडचे तीनही खान म्हणजेच, किंग खान शाहरुख खान, भाईजान सलमान खान आणि आमिर खान हजेरी लावणार आहेत. एवढचं काय तर हे तीनही खान एकत्र येणार असल्याचे समोर आल्यानंतर प्रेक्षकांना आतुरता लागली आहे.

गेल्या काही दिवसांपासून, सारा अली खान, जान्हवी कपूर, अर्जुन कपूर, मलायका अरोरा आणि करीना कपूर खान यांसारखी अनेक लोकप्रिय नावे ‘कॉफी विथ करण’च्या ७ व्या सीझनमध्ये हजेरी लावणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत असल्याचे म्हटले जातं होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The 3 khans of bollywood to grace koffee with karan season 7 dcp