रणवीर सिंग आणि आलिया भट्ट या दोन दमदार कलाकारांना घेऊन दिग्दर्शक झोया अख्तर ‘गली बॉय’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि सोशल मीडियावर त्याचीच जोरदार चर्चा सुरू झाली. मुंबईच्या चाळ संस्कृतीतून रॅपर्सच्या दुनियेत नावलौकिक मिळवणाऱ्या ‘डिवाईन’ म्हणजे विवियन फर्नांडिस आणि ‘रॅपर नॅझी’ म्हणजेच नावेद शेख यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांपासून ‘गली बॉय’च्या कथानकासाठी प्रेरणा घेण्यात आली आहे. या चित्रपटातील संवाद आणि दृश्यांवरून नेटकऱ्यांनी भन्नाट मीम्स पोस्ट केले आहेत.

‘एक दिन मै आपका लिव्हर ट्रान्सप्लांट कर सकती हूँ,’ हा ट्रेलरमधील आलियाचा संवाद असो किंवा मग ‘ये दारू, ये गाडी, ये छोकरी’, हा रणवीरचा रॅप असो, यातील प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांना भावली आहे.

पाहा मीम्स : 

Gully-Boy-Trailer

चित्रपटात रणवीर आणि आलियासोबत मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अमृता सुभाष यामध्ये रणवीरच्या आईच्या भूमिकेत आहे. झोया अख्तर दिग्दर्शित हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader